शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई आर्टीकल
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जुलै 2016 (15:40 IST)

नोकरी लागत नसेल तर घाला व्हाईट लॉकेट

जर तुम्ही नोकरीमुळे परेशान असाल आणि बरेच प्रयत्न केल्यानंतर देखील तुम्हाला नोकरी मिळत नसेल किंवा आत्मविश्वासात कमी आल्यामुळे इंटरव्यूला तुम्ही योग्य प्रकारे फेस करू शकत नसाल तर यासाठी फेंगशुईत काही उपाय सांगण्यात आले आहे. याचे प्रयोग करून तुम्ही यश मिळवू शकता, पण या सोबतच तुम्हाला तुमच्या क्षमतेत वाढ करावी लागणार आहे.  

फेंगशुईत मुलांच्या भविष्याबद्दल बरेच उपाय सांगण्यात आले आहे. त्यातून एक आहे व्हाईट लॉकेट. हे धारण केल्याने मुलांना परीक्षेत यश मिळेल. तसेच अभ्यासात देखील त्याने मन लागेल.  
 
जर तुम्हाला मनाप्रमाणे नोकरी लागत नसेल तर तुम्ही गळ्यात पांढरे लॉकेट धारण करा. असे केल्याने तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढेल. जर गळ्यात स्फटिकाची माळा धारण केली तर तुमचा आभामंडल वेगळाच चमकेल. याला धारण केल्याने आरोग्य विषयक त्रास देखील दूर होईल.  

जर तुम्हाला जास्त राग येत असेल तर हे लॉकेट धारण केल्याने तुम्हाला शांती मिळेल. व्हाईट क्रिस्टलचे हृदयाकार पेंडल युवांसाठी फारच फायदेशीर आहे. हे अभ्यास येणार्‍या अडचणींना दूर करण्यास मदत करतो. याला धारण केल्याने एकाग्रता आणि आत्मविश्वासात वाढ होते.  

आजकाल तरुणांमध्ये फाटलेली जींस धारण करण्याचे क्रेझ आहे, पण असे कपडे तुमच्या गुड लकला बॅड लकमध्ये बदलू शकते. घरात कधीही फाटलेले आणि जुने कपडे घालायला नाही पाहिजे. कपड्यांना धुतल्यानंतर नेहमी उन्हात वाळवायला पाहिजे. धुतलेल्या कपड्यांना कधीही रात्री बाहेर नाही सोडायला पाहिजे. रात्री निगेटिव्ह एनर्जी असते, जी कपड्यांमध्ये येते. जेव्हा आम्ही त्या वस्त्रांना धारण करतो तेव्हा याचा प्रभाव आमच्यावर देखील होतो.