1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल

प्रेमळ संबंधांसाठी स्फटिकाचे गोळे

WDWD
नैऋत्य दिशा अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. कारण नैऋत्येचा कोपरा प्रेम आणि स्नेहाशी निगडित असतो. पृथ्वी (माती) हे या क्षेत्राचे मूलतत्व आहे. या भागाची प्रभावक्षमता वाढविल्यास आयुष्यात खूप काही मिळते. अस्सल स्फटिकाच्या दोन गोळ्यांद्वारे शयनगृहातील नैऋत्य दिशेचा कोपरा क्रियाशील होतो. लोकांशी असलेले संबंध सुधारण्यास, अनेकांशी आपले नाते जोडण्यास हे स्फटिक कारणीभूत ठरतात. चांगले संबंध निर्माण झाल्याने घरातही शांतता नांदते.

स्फटिकाचे गोळे प्रभावी ठरण्यासाठी ते दिवाणखान्यात ठेवावेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंब घट्ट स्नेहरज्जूंनी बांधले जाते. पण हे गोळे ठेवताना काळजी घ्यावी. ते शुद्ध करणे गरजेचे असते. त्या स्फटिकाच्या गोळ्यांशी जोडल्या गेलेल्या नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी, ते आठवडाभर तरी मिठाच्या पाण्यात ठेवले पाहिजेत. स्पटिकात मोठी ऊर्जा असते. आपले विचार ते परावर्तित करतात. तो शुद्ध कसा करावा याचीही पद्धत आहे ती आधी समजून घेऊया.

WDWD
चार चमचे शुद्ध न केलेले सागरी मीठ मिसळून पाण्याचे द्रावण तयार करावे. त्यात स्फटिकाचा गोळा बुडवून ठेवा. मिठाच्या पाण्यात एक आठवडा शुद्धीकरण केल्यानंतर तो गोळा नळाच्या वाहत्या पाण्यात नीट धुऊन चिनी मातीच्या बशीत ठेवावा. मग तो सकाळी सूर्याच्या उन्हात तीन तास ठेवावा. या दरम्यान आपण अशी कल्पना करावी की, आपले संपूर्ण कुटुंब एकत्र आहे आणि सर्वांच्या चेहर्‍यांवर स्मितहास्य उमलेले आहे, म्हणजेच कुटुंबातील सर्व सदस्य खूप आनंदात आहेत.

कोणतीही इच्छा मनात असल्यास त्याच्याशी संबंधित चांगले चित्र रंगवावे. उदाहरणार्थ मुलाचे लग्न असल्यास ते अतिशय धामधुमीत होतेय. घरबांधायचे असल्यास त्या घरात आपण अतिशय आनंदात रहातोय असे विचार कल्पावे. असे चित्र मनात आले की मग तो स्फटिकाचा गोळा उन्हामधून उचलून आणावा आणि तो आपल्या डाव्या हाताच्या पंजावर ठेवावा.

त्यानंतर उजव्या हाताच्या पंजाने तो झाकावा आणि डोळे बंद करून आपल्या मन:पटलावर ठेवावे. ही कल्पना आता स्फटिकाच्या गोळ्यात परावर्तित होईल. आता आपण हा गोळा आपल्या घरातील नैऋत्य दिशेच्या कोपर्‍यात किंवा आपल्या मुलीच्या शयनगृहात ठेवावा. त्यामुळे आपल्या मुलीचा विवाहसोहळा धामधुमीत साजरा होण्याचे भाग्य लाभेल.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा