फेंगशुईचे स्वस्त नि मस्त उपाय
फेंग शुईतील काही स्वस्त नि मस्त उपाय आपण देत आहोत. या वस्तू बाजारात सर्रास उपलब्ध आहेत. हे उपाय सहजसाध्य आहेत. बारीकसा ताप आला म्हणून आपण लगेचच डॉक्टरकडे धाव घेत नाही. एखादी क्रोसीन घेतो आणि बरे होतो, तसाच हा प्रकार.
लॉफिंग बुद्धा
घरात कुठेही ठेवता येतो. प्रसन्नतेत भर पडते.
पुढे पहा तीन पायांचा टोड
तीन पायांचा टोड

घराकडे तोंड करून ठेवतात. फेंग शुई फ्लाईंग स्टार पद्धतीत फायु यलो स्टारची विध्वंसकता कमी करण्यासाठी त्याचा वापर करतात. फायु यलो स्टार जेथे सेव्हन पर्पल किंवा नाईन रेडबरोबर युती करतो त्या प्रभागात हा ठेवला जातो. मात्र तो धातुचा असावा. त्याचे डोळे लाल रंगाचे असावेत आणि त्याच्या पायांना लाल रंगाचा कागद चिकटवलेला असावा. दाराच्या अगदी समोर घराच्या दिशेने तोंड करूनही हा ठेवला जातो. यामुळे मनी लक वाढतं. ऑफिसमध्ये टेबलच्या आग्नेय कोपर्यात ठेवावा.
पुढे पहा कॅलबश
कॅलबश

याला वू लू असंही म्हणतात. आरोग्याचं रक्षण करण्यासाठी तो वापरतात. प्रत्येक बेडरुममध्ये साईड टेबलवर ठेवावा. निगेटिव्ह एनर्जी शोषून घेऊन ती संपवण्याचं काम तो करतो, अशी धारणा आहे.
पुढे पहा मॅन्डेरिन डक
मॅन्डेरिन डक

फेंग शुईतील ही बदकाची जोडी प्रेमाचं प्रतीक आहे. हॉलच्या, बेडरुमच्या किंवा संपूर्ण घराच्या नैऋत्य कोपर्यात ठेवतात. त्यामुळे पती-पत्नीचे वैवाहिक संबंध सुधारतात. त्यांच्यातील प्रेम वृद्धिंगत होतं तर तरुणांच प्रेमप्रकरण मार्गी लागतं.
पुढे पहा ड्रॅगन
ड्रॅगन

हा पूर्व दिशेचा संरक्षक आहे आणि मदत करणार्या लोकांचा प्रतिनिधी आहे. मात्र ड्रॅगन धातुचा असावा. धातु पाण्याचं पोषण करतो आणि पाणी लाकडाचं. त्यामुळे पूर्वेकडील लाकुड तत्त्वाचं पोषण होतं. पाणी नसेल तर ड्रॅगन मरेल अशा अर्थाची एक चिनी म्हणसुद्धा प्रसिद्ध आहे. ड्रॅगन घराच्या आत घराच्या डाव्या बाजूला घराकडे तिरपे तोंड करून ठेवतात. ड्रॅगनबरोबरच की लुनही ठेवणार असाल तर ड्रॅगन की लुनपेक्षा थोडासा जास्त उंचीवर ठेवायला हवा. जर धंदा बसला असेल. पैशाची आवक थांबली असेल तर ऑफिसमध्ये टेबलवर डाव्या हाताला ड्रॅगन ठेवा. स्टॉक ब्रोकर, रियल इस्टेट एजंट, दलाल यांच्यासाठी हा विशेष लाभदायक आहे.
पुढे पहा रत्नांचं झाड
रत्नांचं झाड

हे झाड घराच्या किंवा ऑफिसच्या आग्नेय कोपर्यात ठेवावं. पैशाचा ओघ चालू होतो. मात्र अधूनमधून खडे मिठाच्या पाण्यानं ते धुणं गरजेचं आहे.
पुढे पहा फक लक साऊ
फक लक साऊ

आरोग्य, नशीब आणि भरभराट यांच्या या देवता. घरात कोठेही त्यांना ठेवता येतं. यामुळे भाग्यात वृद्धी होते आणि अपघात, आकस्मिक आजार यांच्यापासून बचाव होतो.
पुढे पहा धावता घोडा
धावता घोडा

अग्नीपुराणात अश्वचिकित्सा नावाचं प्रकरण आहे. त्यात म्हटलंय की घोडे लक्ष्मीचे पुत्र असून गंधर्व कुळातील आहेत. ते उत्तरेतील रत्नांप्रमाणे असतात. ते पवित्र आहेत म्हणूनच अश्वमेध यज्ञात त्यांचं आवाहन करतात. फेंग शुईतील अतिशय परिणामकारक असा हा उपाय आहे. व्यवसायात चांगली प्रसिद्धी मिळावी, धंदा नावारूपाला यावा असं वाटत असेल तर नऊ लाल रंगांचे धावते घोडे दक्षिणेला ठेवावेत.
डा मातीचा किंवा लाकडाचा चालेल. रंग लाल हवा आणि त्याची धाव लयबद्ध असावी. उधळलेले घोडे नकोत.
पाण्यातून धावणारे घोडे नकोत. मी एके ठिकाणी नऊ घोडे ठेवलेले बघितले. एक धावत होता, दुसरा चरत होता, तिसरा बसलेला होता, चौथा नुसताच उनाडत होता.. अशा प्रकारचे घोडे ठेवू नका. सोबतच्या छायाचित्रात दाखविल्याप्रमाणं तंतोतंत घोडा असावा.