सोमवार, 5 जानेवारी 2026
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल
Written By वेबदुनिया|

बदला घराचा 'मूड'

बदला घराचा 'मूड'
ND
तुमच्या घराच्या खिडकीतून सुंदर दृश्य दिसते का? शांत बसावेसे वाटेल अशी एखादी तरी जागा घरात आहे का? तुमच्या घरात तुम्हाला पूर्णपणे सुरक्षित असल्यासारखे वाटते का? घरातील सामान तसेच रंग तुमच्या स्वभावाला अनुकूल आहेत काय? याचे उत्तर नाही असे येत असेल तर तुमच्या घरात बरेच मोठे बदल घडवून आणण्याची गरज आहे.

घरात उदास वाटण्यामागे काही कारणे असतात. व्यवस्थित प्रकाश, आराम करण्यासाठी चांगली जागा, पाहण्यालायक सुंदर वस्तू आणि सुरक्षितता या घरासाठी आवश्यक गोष्टी असतात. घरात या बाबी नसतील तर तुमचे मन घरात रमणे अशक्य होऊन जाते.

सर्वात आधी हे पाहा, की तुमच्या घरात सूर्यकिरण येतात ना? त्याअभावी हार्मोनचे स्रवणे कमी होते आणि आपल्याला थकवा, चीडचीड, एकाग्रता ढळणे आदी जाणवू लागते.

ND
नेहमी अंधार असणार्‍या खोलीत झोपणे टाळा. सकाळच्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी जाग येईल अशी जागा असेल तर उत्तम. सकाळ होताच आपल्या खोलीच्या सर्व खिडक्या उघडा. खोलीत एक असा कोपरा असावा, जिथून तुम्ही बाहेरचे दृश्य पाहू शकाल. तेथे आरामदायक खुर्च्या ठेवा. काही फुले, लिंबू आणि सफरचंद ठेवा. फुले आणि फळांच्या सुगंधामुळे तजेला जाणवत राहील.

घरातील अनावश्यक सामान काढून टाका. कधी-कधी कपाटांमध्ये बरीच कागदपत्रे गोळा झालेली असतात. वेळ मिळाल्यावर काढून टाकू अशा विचारात असाल तर ती आताच फेकून द्या. मग बघा तुमचेच घर किती छान दिसेल ते.

कराल ते स्वत:साठी आणि मन लावून करा. सांगण्यामागचा हेतू हा की घर तुमचे आहे त्यामुळे तुम्हीच येथील महत्त्वपूर्ण व्यक्ती आहात. तुमचे आवडते फोटो किंवा वस्तू लावून घर सजवा. आपलेच काही सुंदर फोटोही लावू शकता. आपल्या टेबलावर ठेवण्यासाठी ताजी फुले, ज्वेलरी ठेवण्यासाठी सुंदर नक्षीदार बॉक्स निवडा.

ND
घरात राहिल्यानंतर मूड छान व्हावा यासाठी रंगांचा प्रयोग करा. पिवळा रंग मुलांसाठी 'आय क्यू लेव्हल' वाढविण्यास मदत करतो. आपल्या बेडरूममध्ये मॅजेंटा आणि लाल रंगाशी मिळते-जुळते रंग प्रणयोत्सुकता वाढवितात. बेडरूममधील बेडशीट, पिलो कव्हर जवळपास रोजच बदलत राहा. तिथे ठेवलेले टिव्ही, रेडिओ, तसेच फोन नेहमीच चालू अवस्थेत राहू देऊ नका. कारण त्यातून इलेक्ट्रोमॅग्नेटीक तरंग निघतात. ते शरीरासाठी हानीकारक असतात.

आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले घर नेहमी स्वच्छ ठेवा. धूळ, कचरा मुळीच नको. झुरळे, डास घरात असतील तर ते नाहीसे करण्यासाठी पाऊल उचला.

हा लेख तुम्हाला कसा वाटला?