1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल

भेटवस्तू म्हणून द्या गुडलक प्लांट

WD
वाढदिवसाच्या पार्टीत वा लग्नाला जाताना काय भेटवस्तू द्यायची हा एक मोठा प्रश्न असतो. आम्ही तुम्हाला एक चांगली भेटवस्तू सुचवत आहोत. तिचे नाव आहे गुडलक प्लांट्स. घेणार्‍यालाही आनंद वाटेल, अशी ही भेटवस्तू आहे. नेहमीसारखे बुके, मेणबत्त्या, शो-पीस या सारख्या वस्तूंपेक्षा गुडलक प्लांट्स उत्तम आहे.

उत्सव कोणताही असो वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, घराची वास्तूपूजा किंवा प्रेमाचे प्रतीक म्हणून काही द्यायचे असेल तर गुडलक बांबू किंवा प्लांट्‍स ही आदर्श भेटवस्तू आहे.

फेंगशुईनुसार गुडलक प्लांट तुमच्या जीवनांत सुख, आरोग्य घेऊन येते. शिवाय जीवनात पुढे जाण्याची सदिच्छा व्यक्त करते. गुडलक प्लांट शांती, सद्भावना, सुरक्षा आणि ऊर्जेचे वातावरण निर्माण करतात. हे प्लांट्‍स घरातल्या कोणत्याही कोपर्‍यात ठेवता येतात.

जीवनात सुख आणि समृद्धीसाठी गुडलक बांबूच्या तीन काड्या, चांगल्या आरोग्यासाठी सात काड्या आणि सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी 21 काड्या भेट स्वरूपात देऊ शकता. घरात पूर्वेकडे गुडलक प्लांट ठेवल्याने जीवनात संतुलन आणि सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होते. हिरव्या रंगांचे लांब, पातळ आणि व्हर्टिकल गुडलक प्लांट तुमच्या ऊर्जा-स्तरात वाढ घडवून आणतात.

लाल दोर्‍यात बांधलेले बांबू जोष, उत्साह आणि उत्तेजनेचे प्रतीक आहे.

गुडलक प्लांट कोणत्याही वातावरणात ठेवता येतात. ते मजबूत असतात. त्यांना सूर्य प्रकाशाची गरज नसते. सावलीत ठेवल्याने पाणी दिल्यावर यांची वाढ होते. यांना रोज पाणी द्यायची व कोणत्याही खताची गरज नसते.बांबूच्या रोपाला एका कंटेनरमध्ये पाणी भरून सोडून द्या. आठवड्यातून एकदा पाणी बदलून दिले पाहिजे.

आता कोणत्याही उत्सवात जायचे झाले तर ही भेट वस्तू लक्षात ठेवा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा