शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई आर्टीकल
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑगस्ट 2014 (12:20 IST)

मलेशिया, सिंगापूरमध्ये घोस्ट फेस्टिव्हल

चीन, मलेशिया, सिंगापूर, हाँगकाँग, तैवान अशा अनेक देशात 10 ऑगस्टपासून घोस्ट फेस्टिव्हल म्हणजे भूत महोत्सव साजरा केला जात असून तो पंधरा दिवस चालणार आहे. 
 
कासवाच्या आकाराचा केक केला जातो. फेंगशुईनुसार कासव हे दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. या निमित्ताने घरी पाहुण्यांना बोलावून मेजवानी दिली जाते. वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सार्वजनिक स्वरूपातही मोठमोठय़ा मिरवणुका काढल्या जातात. फटाके उडविले जातात. व्हिएतनाममध्ये हाच सण फेस्टिव्हल म्हणून साजरा केला जातो. 

या निमित्ताने घरोघरी विशिष्ट सजावट करून प्रार्थना केल्या जातात. अनेक आशियाई देशांत भूत, प्रेत, आत्मा यासारख्या बाबींवर लोकांचा विश्वास आहे. गेली कित्येक शतके त्यासाठी विविध महोत्सव साजरे केले जातात. 
 
चीनच्या कालनिर्णय दिनदर्शिकेप्रमाणे वर्षातील सातवा महिना हा मुक्ती महिना असतो. या दिवशी पृथ्वीवर अडकून पडलेल्या आत्म्यांना मुक्ती मिळू शकते. याच दिवशी नरकाचे दरवाजे उघडतात असाही समज आहे. आपल्या आप्तांना मुक्ती मिळावी यासाठी घरोघरी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. विविध खाद्यपदार्थ फळे नैवेद्य म्हणून ठेवली जातात.