बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. फिफा विश्वचषक
Written By
Last Modified: रविवार, 27 नोव्हेंबर 2022 (16:07 IST)

FIFA World Cup: ब्राझीलला मोठा धक्का, स्टार खेळाडू नेमार पुढील सामन्यातून बाहेर

जगातील अव्वल फुटबॉलपटूंपैकी एक असलेला ब्राझीलचा नेमार ज्युनियर कतार विश्वचषकाच्या पुढील दोन सामन्यांमधून बाहेर पडला आहे. पाचवेळा चॅम्पियन ब्राझीलसाठी हा मोठा धक्का आहे. नेमार हा संघाचा स्टार खेळाडू असून त्याच्याविरुद्ध विरोधी संघ स्वतंत्रपणे योजना आखतो. नेमारला रोखण्यासाठी सर्बियाच्या संघाने शेवटच्या सामन्यात सर्वाधिक फाऊल केले.
 
सर्बियाविरुद्ध त्याच्या संघाच्या पहिल्या विजयात घोट्याच्या अस्थिबंधनाला दुखापत झाल्याने नेमारला ब्राझीलच्या स्वित्झर्लंडविरुद्धच्या विश्वचषकातील पुढील सामन्याला मुकावे लागणार आहे, असे ब्राझील संघाच्या डॉक्टरांनी शुक्रवारी सांगितले. दोन्ही संघांमधील हा सामना 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर ब्राझीलचा संघ ३ डिसेंबरला कॅमेरूनविरुद्ध खेळणार आहे. त्या सामन्यात नेमारचे खेळणे संशयास्पद मानले जात आहे.
 
गुरुवारी सर्बियाविरुद्धच्या 2-0 च्या विजयादरम्यान नेमारच्या घोट्याला सूज आल्याने दिसला. ब्राझिलियन फुटबॉल फेडरेशनचे (सीबीएफ) डॉक्टर रॉड्रिगो लस्मार यांनी सांगितले की, नेमारला लिगामेंटला दुखापत झाली आहे. ब्राझीलचा बचावपटू डॅनिलो देखील घोट्याच्या दुखापतीमुळे स्वित्झर्लंडविरुद्धच्या सोमवारच्या सामन्याला मुकणार आहे.
 
या सामन्यात निकोला मिलेंकोविचशी टक्कर दिल्यानंतर नेमारला दुखापत झाली होती, मात्र त्यानंतरही तो 10 मिनिटे खेळत राहिला. यानंतर अँटोनीने मैदानात आपली जागा घेतली. सामन्यानंतर नेमार पायावर पट्टी बांधलेला दिसला.
 
Edited By - Priya Dixit