चित्रपटाचे कथानक दहशतवादी व मुंबई पोलिसांभोवती गुंफण्यात आले आहे. दहशतवादी मुंबईच्या पोलीस महासंचालकाला शहरात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात व त्यांच्या चार सहकार्यांना सोडून देण्याची मागणी करतात. सुरवातीला महासंचालक ही बाब फार गंभीरपणे घेत नाही. मात्र पोलीस हेडक्वॉर्टरजवळ एक जिवंत बॉम्ब सापडतो, त्यावेळी मात्र त्यांना धमकीचे गांभीर्य कळते. पोलिस धमकी देणार्या व्यक्तीचा शोध घेतात. या कामात 17 वर्षींय कम्प्युटर हॅकरची मदत घेतली जाते. दहशतवादी एका न्यूज चॅनलच्या रिपोर्टरलाही शहरात बॉम्ब ठेवल्याचे सांगतात. नसरूद्दीन शाहने यात दहशतवाद्याची भूमिका केली आहे. मुंबईचे पोलीस दहशतवाद्यांच्या चार सहकार्यांना सोडून देतात काय? दहशतवादी बॉम्ब कुठे पेरून ठेवतात? मुंबई पोलीस त्यांना पकडण्यात यशस्वी होतात काय? तुमच्या मनातील या प्रश्नांची उकल 'अ वेन्सडे’ पाहिल्यानंतरच होईल.