निर्माता : इरोज़ इंटरनेशनल, बाउंड स्क्रिप्ट पिक्चर्स दिग्दर्शक : सुजॉय घोष संगीत : विशाल शेखर कलाकार : अमिताभ बच्चन, संजय दत्त, रितेश देशमुख, जैकलीन फर्नांडिस
गोष्टीतला अल्लादिन आणि या चित्रपटातला अल्लादिन (रितेश देशमुख) यांच्यात काहीही साम्य नाही. कासीम हा त्याचा शाळेतला मित्र आणि त्याचे टोळके तेवढे त्याला गोष्टीतल्या अल्लादिनच्या नावाने चिडवत असतात. त्याचा जादुचा दिवा आणि त्या दिव्यातून बाहेर पडणारा राक्षस कुठे आहे अशी कुत्सित विचारणाही करत असतात. कासीम आणि त्याच्या गॅंगला तर तो हल्ली घाबरायलाही लागलेला असतो.
लाजरा-बुजरा अल्लादिन त्याच्या कॉलेजातच शिकणार्या जस्मिनच्या (जॅकलिन फर्नांडिस) प्रेमात पडला आहे. अल्लादिनला ही जस्मिन एक दिवा भेट म्हणून देते. तो पाहून कासिम त्याची टर उडवतो. या दिव्याला घास म्हणजे त्यातून राक्षस निघेल, असा सल्लाही ते गंमती गंमतीत देतात.
IFM
IFM
अल्लादिन असे करतो आणि खरोखरच त्यातून राक्षस बाहेर येतो. त्याला पाहून अल्लादिन घाबरून जातो. नंतर त्याला तो निघून जायला सांगतो. पण राक्षस त्याचा पिछा काही सोडत नाही. अल्लादिनच्या तीन इच्छा पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही, असे तो सांगतो. अखेर अल्लादिन त्या तीन इच्छा सांगतो आणि राक्षस त्या पूर्ण करतो. पण दुष्ट जादूगार रिंग मास्टरला (संजय दत्त) या जादुच्या दिव्याविषयी कळते आणि हा दिवा मिळविण्याच्या प्रयत्नाला तो लागतो. त्यानंतर चांगल्या आणि वाईटातली लढाई सुरू होते. हा सगळा रंगतदार पद्धतीने यात मांडला आहे.