बुधवार, 7 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

आ देखे जरा...

बिपाशा बसु
निर्माता : विकी राजानी
दिग्दर्शक : जहाँगीर सुरत
संगीत : गौरव दासगुप्ता, प्रीतम चक्रवर्ती
कलाकार : बिपाशा बसु, नील नितिन मुकेश, राहुल देव, सोफी चौधर

संजय दत्तच्या 'रॉकी'या पहिल्या चित्रपटातच 'आ देखे जरा...' हे गाणे आहे. त्यावरूनच या चित्रपटाचे नाव ठेवले आहे. आधी याचे नाव 'फ्रीज' असे होते, पण नंतर ते बदलण्यात आले.

ही कथा आहे रे आचार्य (नील नितिन मुकेश) याची. रे फोटोग्राफर आहे. स्वतःची ओळख प्रस्थापित करण्यासाठी तो झगडतो आहे. एकदा त्याच्या हाती आजोबांचा कॅमेरा लागतो. हा कॅमेरा वेगळा आहे. यातून पाहिल्यानंतर भविष्यात काय घडते ते दिसते, हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

कॅमेरा मिळाल्यानंतर रेचे आयुष्य बदलून जाते. पैसा भरपूर मिळतो. हवे ते सुख मिळते. त्याचबरोबर सिमी (बिपाशा बासू) ही मुलगीही मिळते. सिमी सेक्सी आहे. आयुष्य स्वतःच्या अटींवर जगणारी मुलगी आहे. डिजे म्हणून ती काम करते.

रेला कॅमेरा मिळाल्यानंतर काही संकटांनाही तोंड द्यावे लागते. काही गुंडांशी त्याची गाठ पडते. त्यांच्याशी लढता लढता तो मार्ग काढतो.

'आ देखे जरा...' हा रोमॅंटिक, म्युझिकल, थ्रिलर व एक्शन चित्रपट असल्याचा दिग्दर्शकाचा दावा आहे. बघूया हा दावा किती खरा ठरतो ते.