1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट

आगामी चित्रपट: फरारी की सवारी

फरारी की सवारी
निर्माता: विधु विनोद चोपडा
दिग्दर्शक: राजेश मापुस्कर
संगीत: प्रीतम चक्रवर्ती
कलाकार: शर्मन जोशी, बोमन ईरानी, ऋत्विक साहोरे, विद्या बालन (पाहुणी कलाकार)
प्रदर्शनाची तारीख: १५ जून, २०१२

PR
PR
फरारी की सवारी हा चित्रपट बाप-लेकाच्या नातेसंबंधावर आधारीत आहे. त्यांच्या नात्यातील भावस्पर्शी चित्रण यामध्ये करण्यात आले आहे. रूसीच्या मुलांस क्रिकेटचे वेड आहे. त्याने लॉर्ड्स मैदानावर खेळायचे स्वप्न उराशी बाळगले आहे. आपल्या मुलावर रूसीचे खूपच प्रेम आहे. त्याची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो नेहमी धडपडत असतो.

साधा-सरळ आणि प्रामाणिक स्वभावाचा रूसी मालकास सांगितल्याशिवाय एके दिवशी एका तासांसाठी लाल रंगाची फरारी मागून आणतो. फरारी हाती लागल्यानंतर आपल्या जीवनात तुफान येईल, हे त्यास माहित नसते.

फरारीत बसल्यापासून एक बेबंद प्रवास सुरू होतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांसोबत भेट होते. यामध्ये एक वेडिंग प्लानर, लॉरेल आणि हार्डीची जोडी, लालची नेता आणि त्याचा बेजबाबदार मुलगा, कार चोरणारा मॅकेनिक यांचा समावेश असतो.

बेईमानी आणि चोरांच्या दुनियेत फरारी धावते तेव्हा कित्येक जखमा भळभळतात आणि दुश्मनीच्या अध्यायास सुरूवात होते. एका रात्रीत कित्येक लोकांचे जीवन नवीन वळणावर येऊन पोहचते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा