बुधवार, 7 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By अभिनय कुलकर्णी|

ऑल दि बेस्ट

अजय देवगण
बॅनर : अजय देवगन फिल्म्स
निर्माता : अजय देवग
दिग्दर्शक : रोहित शेट्टी
गीतकार : कुमार
संगीतकार : प्रीतम
कलाकार : अजय देवगण, बिपाशा बसु, फरदीन खान, संजय दत्त, मुग्धा गोडसे, असरानी, मुकेश तिवारी, जॉनी लीवर, संजय मिश्र

गोलमाल आणि गोलमाल रिटर्न्सनंतर अजय देवगण पुन्हा एकदा दिवाळीच्या मुहूर्तावर 'ऑल दी बेस्ट' हा विनोदी चित्रपट घेऊन येतो आहे. वीर कपूर (फरदीन खान) रॉकस्टार असल्याचे सांगत असतो, पण त्याच्याकडे नेहमीच पैशाची चणचण असते. त्याचा सावत्र भाऊ धरम कपूर ( संजय दत्त) दुसरीकडे रहात असतो. वीरच्या पैशाचा स्त्रोत त्याचा हा भाऊच असतो. त्याच्याकडून जास्तीत जास्त पैसे कसे उकळता येतील, याचीच त्याला फिकर असते. त्यासाठी तो धरमला आपण विवाहित असल्याचे सांगतो. किमान त्यामुळे तरी आपला भाऊ आपल्याला जास्तीत जास्त मदत देईल अशी त्याची अपेक्षा असते.

विद्यावर (मुग्धा गोडसे) वीर लाईन मारत असतो. पण तिचे वडिल (असरानी) त्याला दारासमोर उभेही करत नाहीत. वीरचा दोस्त प्रेम चोपडा (अजय देवगण) त्याला सगळी मदत करत असतो. त्याची बायको जान्हवी (बिपाशा बसू) घरची जीम चालवत असते.

IFM
IFM
काही कारणासाठी प्रेम आणि वीर एका डॉनकडून (जॉनी लिव्हर) पैसे उधार घेतात. पण ते डुबवून बसतात. आता ते चुकते करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नाही. डॉनपासून तोंड लपवून ते फिरताहेत. हे कमी की काय म्हणून वीरचा भाऊ धरम त्याला भेटायला येतो. प्रेमच्या बायकोला म्हणजे जान्हवीला तो वीरची बायको समजतो आणि वीरच्या प्रेयसीला तो प्रेमची बायको समजतो.

या सगळ्या गोंधळात वीर आणि प्रेम दोघेही अडकून जातात. एकीकडे डॉन, दुसरीकडे हे गोंधळ यामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनते. ती पडद्यावरच पहायला मजा येईल.