ओम शांती ओम : पुनर्जन्माची कथा
|
दिग्दर्शक :फराह खान
गीत :विशाल डडलानी, जावेद अख्तर, कुमार
संगीत :विशाल-शेखर
कलाकार :शाहरूख खान, दीपिका पदुकोण, श्रेयस तळपदे, अर्जुन रामपाल, किरण खेर
फराह खान दिग्दर्शित 'ओम शांती ओम' पुनर्जन्मावर आधारीत कथा आहे. चित्रपटाची सुरवात सत्तरच्या दशकात सुरू होऊन हळूहळू आजच्या दशकात प्रवेश करते. त्या दशकातील कार, चष्मे, केशरचना हे सर्व दाखविण्यासाठी फरहाने विशेष काळजी घेतली आहे. चित्रपटाची कथा बॉलीवूडभोवती फिरते. तो काळ धर्मेंद्र, जितेंद्र, राजेश खन्ना या अभिनेत्यांनी गाजवला होता. यामुळे या चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पदुकोणला विशेष तंत्रांचा वापर करून या लोकप्रिय कलाकारांसोबत गाणे गाताना दाखविले गेले आहे.
ओम प्रकाश माखिजा (शाहरूख खान) याच काळातील कलाकार आहे. ओमचे चित्रपटात नायक बनण्याचे स्वप्न आहे. परंतु, चांगला अभिनेता
|
|
