- मनोरंजन
» - बॉलीवूड
» - आगामी चित्रपट
कम्बख्त इश्क
बॅनर : नाडियाडवाला ग्रेंडसन एंटरटेनमेंट, ईरोज़ एंटरटेनमेंट निर्माता : साजिद नाडियाडवालादिग्दर्शक : साबिर खानगीतकार : आरडीबी, अंविता दत्त गुप्तान, साबिर खान संगीत : आरडीबी, अनू मलिक, सुलेमान मर्चेण्टकलाकार : अक्षय कुमार, करीना कपूर, आफताब शिवदासानी, अमृता अरोरा, सिल्वेस्टर स्टेलॉन '
कम्बख्त इश्क' दोन व्यक्तींच्या परस्परातील नात्यांची कहाणी आहे. या व्यक्तींचे स्वभावही परस्परांहून अगदीच भिन्न आहेत. विराज (अक्षय कुमार) हॉलीवूडमधील प्रसिद्ध स्टंटमॅन आहे. बड्या बड्या हिरोंचा तो डमी आहे. प्रेम आणि लग्न हे दोन शब्द त्याच्या शब्दकोशात नाहीत. स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी पारंपरिक आहे. स्टंटमधून मिळणारे पैसे तो स्त्रियांवर उडवतो. सिमरिता (करीना कपूर) सर्जन होणार आहे. फावल्या वेळात ती मॉडेलिंगही करते. स्वतःच्या बळावर सुपरमॉडेल बनलेल्या सिमरिताचा पुरूषांवर विश्वास नाही. पुरूषांची आयुष्याला गरजच काय असा तिचा सवाल आहे. विराजचे छोटा भाऊ लकीवर (आफताब शिवदासानी) खूप प्रेम आहे. पण विराजपेक्षा लकी वेगळा आहे. तो कामिनीवर (अमृता अरोरा) प्रेम करतोय. तिच्याशी त्याला लग्नही करायचेय. कामिनी मॉडेल आहे आणि सिमरिताची मैत्रिण आहे. विराज लकीला आणि सिमिरिता अमृताला लग्नपासून परावृत्त करू पाहते. पण दोघेही ऐकत नाही. लकी व कामिनीचे लग्न होते. या माध्यमातून विराज आणि सिमरिता परस्परांच्या विरोधात उभे रहातात. लग्नापर्यंतच्या या प्रवासात विराज आणि सिमरितामध्ये काय घडते याचा रंजक प्रवास म्हणजे 'कम्बख्त इश्क' हा चित्रपट आहे.