शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

कर्मा और होली

कर्मा और होली
IFM
निर्माता - डीरिना डी नीरो, प्रशांत शाह, डेविड रोमा
दिग्दर्शक - मनीष गुप्ता
कलाकार - सुष्मिता सेन, रणदीप हुडा, रती अग्निहोत्री, सुरेश ओबेरॉय, सुचित्रा कृष्णमूर्ती, दीपल शॉ, नाओमी कॅपबेल, डीरिना डी नीरो

या चित्रपटाचे पहिले शीर्षक होते ‘कर्मा, कंफेशन्स एंड होली'.. पण, हे नाव लांबलचक आहे असे नायिका सुष्मिता सेनला वाटले आणि तिने नाव छोटे करण्यास सांगितले आणि या चित्रपटाचे नाव 'कर्मा और होली' असे झाले.

IFM
नात्यांमध्ये येणारे चढ-उतार आणि विविध देशांती विभिन्न संस्कृती यातून दाखविण्यात आली आहे. होळीच्या एक दिवस पूर्वी रणदीप आणि सुष्मिता आपल्या मित्रांना घरी बोलवितात. ही मित्रमंडळी वेगवेगळ्या वयाची असतात. कुणी विवाहित तर काहींच्यात रोमांस सुरू असतो.

जसजशी रात्र ओररू लागते दारूच्या नशेमध्ये सर्वचजण धुंद होऊन जातात. नशेमध्ये एकमेकांपासून लपविलेल्या गोष्टी त्यांच्या तोंडून बाहेर येतात आणि त्यांच्या मैत्रीमध्ये फुट पडू लागते.

दुस-या दिवशी होळी असते. यादिवशी एकमेकांचे शत्रुत्व विसरून ते पुन्हा चांगले मित्र बनतात आणि नवीन सुरुवात होते.