महाबली खलीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहून बॉलिवूडमधील निर्माते-दिग्दर्शकांमध्ये त्याला साइन करण्यासाठी प्रचंड घाई सुरू असल्याचे दिसून येते. परंतु, बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय खली विचारपूर्वकच घेणार आहे. दिग्दर्शक राजीव कुमार यांच्या आगामी 'कुस्ती' नावाच्या चित्रपटात खली आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटात राजपाल यादव, असारानी, नर्गिस आणि मनोज जोशी हे खलीबरोबर काम करणार आहेत.
चित्रपटात राजपाल यादव एका पोस्टमनच्या भूमिका साकारणार असून तो आपल्याच गावातील नर्गिस नावाच्या मुलीला पसंत करत असतो. नर्गिसचे वडील पहिलवान आहेत. ते आपल्या मुलीचा विवाह अशा व्यक्तीबरोबर करू इच्छितात की, जो खलीला कुस्तीमध्ये पराभूत करू शकतो.
चित्रपटात काम करण्यासाठी अनेक ऑफर्स येवू लागल्यामुळे खली खूपच आनंदी आहे. कारण, त्याला साइन करण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ लागली आहे.
बॉलिवूडमध्ये पसरलेल्या भ्रष्ट्राचाराविषयी मला अनेकांनी कल्पना दिली होती. परंतु, राजीव कुमार आणि राजपाल यादव यांना भेटल्यानंतर माझ्या सर्व शंका दूर झाले असल्याचे खलीने सांगितले. 'कुस्ती' एक संगीतमय चित्रपट असून भारतीय प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.