दिग्दर्शक : शोएब मंसूर संगीत : रोहैल हयात कलाकार : शान, नसीरुद्दीन शहा, इमान अली, हमीद शेख भाषा : उर्दू
चार एप्रिलला पाकिस्तानी चित्रपट 'खुदा के लिए' प्रदर्शित होत आहे. सामान्य भारतीय किंवा पाकिस्तानी चित्रपटाप्रमाणे या चित्रपटात नाच, गाणे किंवा प्रणय नाही. हा चित्रपट गंभीर आहे. 9/11 नंतर पाकिस्तानी आणि मुस्लीम बांधव यांची स्थिती किती वाईट झाली आहे हे या चित्रपटात दाखविले आहे.
चित्रपटात कट्टरवादी आणि आधुनिक विचारसरणी असणार्या मुसलमान बांधवांमध्ये असलेले मतभेद दाखविले गेले आहेत. शिकलेले, आधुनिक विचारधारा असणार्या या तरुणांना पाश्चात्य जीवनशैली आकर्षित करते. त्यामुळे कट्टरपंथी लोक त्यांना डिवचतात आणि मुसलमान असल्यामुळे पाश्चात्य जगत त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने बघते.
या चित्रपटातून तरुण मुसलमान बांधवांना पडणार्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
हा चित्रपट पाकिस्तान, ब्रिटन आणि अमेरिकेत 2007 मध्येच प्रदर्शित झालेला असून चित्रपटाला बरेच पुरस्कार देखील मिळाले होते.