संबंधित माहिती
- Beautiful And Peaceful Ashrams India भारतातील सर्वात शांत आणि सुंदर आश्रम
- Vasant Panchami Tourist Places वसंत पंचमीला भेट देण्यासाठी 5 सर्वोत्तम ठिकाणे
- माघी गणेश जयंती निमित्त पुण्यातील या प्रसिद्ध गणपती मंदिरांना भेट देऊन बाप्पाचा आशीर्वाद घ्या
- Places to visit on Republic Day प्रजासत्ताक दिन विशेष भेट देण्यासाठी ही ठिकाणे नक्कीच एक्सप्लोर करा
- Coconut Island in India भारतातील रहस्यमय 'कोकोनट आयर्लंड' नक्कीच भेट द्या
Kanakaditya Sun Temple दुर्मिळ आणि जागृत सूर्य मंदिरांपैकी एक कनकादित्य मंदिर रत्नागिरी
Maharashtra Tourism : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी या गावात असलेले 'कनकादित्य मंदिर' हे महाराष्ट्रातील अत्यंत दुर्मिळ आणि जागृत सूर्य मंदिरांपैकी एक आहे. आज २५ रथ सप्तमी म्हणजेच सूर्य जयंतीअसल्याने या मंदिरात महत्त्व आणि तिथला उत्साह अधिकच वाढला आहे. दरवर्षी अनेक भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात. कोकण रत्नागिरी येथे असल्याने मंदिर देखील खूप सुंदर आहे.
कनकादित्य मंदिर मंदिराची वैशिष्ट्ये
इतिहास
असे मानले जाते की, हे मंदिर सुमारे ८०० ते ९०० वर्षांपूर्वीचे आहे. या मंदिराच्या स्थापनेमागे एक प्रसिद्ध लोककथा आहे. एका व्यापाराचे जहाज समुद्रातून जात असताना कशेळीच्या किनाऱ्याजवळ ते अचानक थांबले. खूप प्रयत्न करूनही जहाज पुढे जाईना. त्या जहाजात सूर्याची एक भव्य मूर्ती होती.
व्यापाराला स्वप्नात दृष्टांत झाला की, ही मूर्ती या भागात स्थापित करायची आहे. 'कनका' नावाच्या एका सूर्यभक्त महिलेने आपल्या झोपडीत या मूर्तीची स्थापना करण्यास मदत केली. 'कनका' आणि 'आदित्य' (सूर्य) यांच्या नावावरून या मंदिराला 'कनकादित्य' असे नाव पडले.
मूर्तीचे वैशिष्ट्य
येथील सूर्याची मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली असून ती अत्यंत तेजस्वी आणि प्रसन्न आहे. सूर्याच्या हातात कमळाची फुले असून मूर्तीची रचना प्राचीन शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. विशेष म्हणजे, हे मंदिर जांभा दगडाने बांधलेले असून कोकणच्या पारंपारिक वास्तुकलेचा प्रभाव त्यावर दिसतो.
प्रमुख उत्सव
रथ सप्तमी उत्सव
कनकादित्य मंदिरात 'रथ सप्तमी' हा वर्षातील सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी सूर्याच्या मूर्तीची भव्य रथातून गावातून मिरवणूक काढली जाते. राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी कशेळीत येतात. हा उत्सव केवळ एका दिवसाचा नसून पाच दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला असतो.
इतर आकर्षण
मंदिराच्या आवारात एक मोठी 'ताम्रकुंडी' आहे. असे म्हटले जाते की, या कुंडीतील पाणी कधीही आटत नाही. तसेच, मंदिराचा लाकडी सभामंडप आणि त्यावरील कोरीव काम पाहण्यासारखे आहे.
कनकादित्य मंदिर रत्नागिरी जावे कसे?
रत्नागिरी शहरापासून हे मंदिर रत्नागिरीपासून दक्षिणेला सुमारे ३० ते ३५ किमी अंतरावर आहे. तर राजापूर शहरापासून हे अंतर सुमारे ३० किमी आहे. रत्नागिरी किंवा राजापूरहून खासगी वाहन किंवा एसटी बसने कशेळीला सहज पोहोचू शकता.
