निर्माताः जगदीश शर्मा, करण निर्देशकः आदित्य दत्ता गीतकारः समीर संगीतकारः अन्नू मलिक कलाकारः आर्यमन, सायली भगत, रणवीर शौरी, लकी अली, अर्चना पूरनसिंह, शरद सक्सेना, मुश्ताक खान, नाज़नीन पटेल विकी (आर्यमन) एक नवोदित गायक असून एका मोठ्या संधीच्या प्रतीक्षेत आहे. सबा (सायली भगत) एका जाहिरात एजन्सीत नोकरी करते. सबाचे नशीब चांगलेच बलवत्तर आहे, आणि तिच्या प्रत्येक पावलावर तिला यश हमखास मिळतं. सबाच्या चुंबनात तिच्या चांगल्या नशिबाची ताकत लपली आहे.
PTI
एक दिवस एका पार्टीत सबाकडून अनवधानाने विकीचे चुंबन घेतले जाते. नंतर विकीचे नशीब चांगलेच फळफळते. संगीत जगतातील बडी असामी तरुण चोपड़ा (लकी अली) विकीची निवड त्याच्या आगामी चित्रपटासाठी गायक म्हणून करतो आणि विकीचे स्वप्न पूर्ण होते. तर इकडे विकीचे चुंबन घेतल्यानंतर सबाचे नशीब मात्र तिच्यापासून दूर जाते. तिची नोकरी हातची जाते आणि तिचे चांगलेच हाल होऊ लागतात. एक टॅरो कार्ड रीडर (अर्चना पूरनसिंह) तिला सांगते की तिने पुन्हा विकीचे चुंबन घेतले तर तिचे गुडलक तिला परत मिळू शकेल. सबा समोर संकट उभे राहते की विकीला ओळखायचे कसे कारण त्याने पार्टीत मास्क परिधान केले. विकीचा शोध घेतला जातो. या दरम्यानच सबा विकीवर प्रेम करू लागते. मात्र ती विकीला ओळखू शकत नाही. एक दिवस तिला हे कळते. तिचा स्वार्थ जागतो आणि ती विकीचे चुंबन घेऊन आपले गेलेले नशीब पुन्हा मिळविते. विकी आयुष्यात पुन्हा स्ट्रगल करावा लागतो. सबाला लक्षात येते की तिने चूक केली आहे. शेवटी विजय प्रेमाचा होतो. सबा विकीचे पुन्हा चुंबन घेते आणि दोघांचे नशीब जोरात सुरू होते.
PR
दरम्यान, या चित्रपटाच्या कथेत काही अडचणीही आहेत. टॅरो कार्ड रीडर सबाच्या नशिबाची मेख पोलिस अधिकारी (शरद सक्सेना), सबाचा बॉस (नाज़नीन पटेल), रणवीर शौरी यांना सांगितला आहे. या सर्वांची इच्छा आहे, की सबाने त्यांचे एकदा तरी चुंबन घ्यावे. नंतर सबा आणि विकी कसे त्यांचे 'गुड लक' सांभाळून ठेवतात ते दाखविताना विनोदाची निर्मिती केली आहे.