शुक्रवार, 9 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

देख भाई देख

देख भाई देख सिनेगप्पा
IFM
बॅनर : ए सर्च फिल्म प्रोडक्शन
निर्माता : विवेक सुदर्शन, अशोक चौहान
दिग्दर्शक : राहत काज़मी
संगीत : नायाब, शादाब भारतीय
कलाकार : ग्रेसी सिंह, सिद्धार्थ कोइराला, रघुवीर यादव, विजय राज, असरानी, वीरेंद्र सक्सेना, अरुण बक्षी

'देख भाई देख' ही पश्चिम उत्तर प्रदेशात रहाणार्‍या चार जणांची कथा आहे. या चौघांचीही वेगवेगळी महत्त्वाकांक्षा आहे. त्या पूर्ण करण्यासाठी एकच मार्ग आहे असे त्यांना वाटते, तो म्हणजे, गुन्हेगारीचा.

बबलीचे (ग्रेसी सिंह) लग्न एका श्रीमंत कुटुंबात झाले होते. पण दुर्देवाने ते तुटले. घटस्फोट घेऊन ती घरी आली आहे. कडवट भूतकाळाला मागे टाकून नव्याने आयुष्य सुरू करण्याचा तिचा मानस आहे. त्यासाठी तिला पैसा हवा आहे.

बबलीचा लहानपणीचा मित्र श्यामला (सिद्धार्थ कोईराला) सरकारी नोकरी मिळतेय. पण या नोकरीसाठी त्याला एका मंत्र्याला लाच द्यायची आहे. पण त्यासाठी त्याच्याकडे पैसा नाहीये.

IFM
मग तो चोरीची एक योजना आखतो. बबलीही त्यात सामील होते. या योजनेत त्यांच्याबरोबर यादव (रघुवीर यादव) हा नेताही असतो. यादवला निवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडून तिकिट हवे आहे. पण त्यासाठी त्याला पार्टी फंडात पैसे भरायचे आहेत.

तिघांनाही पैशांची गरज आहे. चोरी हाच त्यांच्यासमोर रस्ता आहे. पण चोरीचा अनुभव नाही. अखेर ते एका प्रोफेशनल चोरावर (विजय राज) ही जबाबदारी सोपवतात. त्यानंतर हास्यास्पद घटनांची मस्त मालिका सुरू होते. त्याचा शेवटही तितकाच धक्कादायक आहे.