गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

लव्ह खिचडी

लव्ह खिचडी सिनेगप्पा
IFM
बॅनर : विक्टोरिया एंटरटेनमेंट प्रा.लि., पिट्टी ग्रुप
निर्माता : कृष्ण कुमार पिट्टी
दिग्दर्शक : श्रीनिवास भाश्याम
संगीत : प्रीतम चक्रवर्ती
कलाकार : रणदीप हुड्डा, रिया सेन, दिव्या दत्ता, सोनाली कुलकर्णी, रितुपर्णा सेनगुप्ता, कल्पना पंडित, जेसी रंधावा, सदा, सौरभ शुक्ला, संजय मिश्र

वीर प्रताप सिंहने पूसा केटरींग कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे. आता तो मुंबईतल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शेफ आहे. स्वतःचे हॉटेल असावे हे त्याचे स्वप्न आहे. स्त्रिया हा त्याचा वीक पॉईंट आहे. त्यामुळे त्यांच्या मागे लागणे हा त्याचा रिकामा उद्योग आहे. घरात काम करणार्‍या शांताबाईपासून कॉर्पोरेट महिलेपासून प्रत्येक महिलेच्या मागे तो लागला आहे. या प्रत्येकीला तिच्या स्वभावानुसार त्याने पदार्थांची नावे दिली आहेत. या सगळ्या महिला मंडळाचा त्याला येणारा गमतीदार अनुभव हा या चित्रपटाचा खरा 'मसाला' आहे. तो येथेच चाखून पाहण्यापेक्षा पडद्यावर पहायला नक्की मजा येईल.