लग्नाचा लाडू खाल्ला तरी ताप आणि नाही खाल्ला तरी ताप. काहींचा लग्नसंस्थेवर विश्वास असतो काहींचा नसतो. काही जणांचा लव्ह मॅरेजवर विश्वास असतो काहींचा अरेंज मॅरेजवर. लाईफ पार्टनरची कथा याच मंडळींच्या आसपास फिरते.
करण (फरदीन खान) व संजना (जेनेलिया डिसूझा) परस्परांवर प्रेम करतात. जणू 'मेड फॉर इच अदर' असे त्यांचे आहे. आता लग्न ही पुढची पायरी उरली आहे. लव्ह मॅरेजद्वारे योग्य लाईफ पार्टनर निवडला जाऊ शकतो काय?
भावेश (तुषार कपूर) लाईफ पार्टनर म्हणून प्राचीला (प्राची देसाई) त्याच्या कुटुंबियांनी पसंत केली आहे. पण प्राची सून म्हणून कसोटीला उतरू शकेल काय? हे अरेंज मॅरेज यशस्वी ठरू शकेल काय?
जीत (गोविंदा) वकिल आहे. घटस्फोटाच्या केसेस त्याच्याकडे प्रामुख्याने येत असतात. लग्नावर त्याचा विश्वास नाही. त्याचे हे धोरण योग्य आहे काय? त्याला स्वतःला कुणी लाईफ पार्टनर मिळेल काय?