शनिवार, 3 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

हायजॅक

हायजॅक
IFM
निर्माता : दिनेश विजान, कुणाल शिवदासानी
निर्देशक : कुणाल शिवदासानी
कलाकार : शायनी अहुजा, ईशा देओल, के. के. रैना, मोना आंबेगावकर, कावेरी झा

विक्रम मदान (शायनी अहुजा) चंडीगढ़ विमानतळावर अधिकारी पदावर कार्यरत आहे. लोकांशी भेटीगाठी त्याला आवडत नाही. त्याचा एकमात्र मित्र राजीवही त्याच विमानतळावर कार्यरत आहे.

एक दिवस विक्रमला बातमी समजते, की ज्या विमानातून त्याची मुलगी दिल्ली ते अमृतसर जात आहे ते हायजॅक करण्‍़यात आले आहे. त्या विमानात 6 दहशतवादी आहेत आणि त्यांनी दहशतवादी मकसूद (केके रैना) याच्या सुटकेची मागणी केली आहे.

मकसूद एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. आतंकवादी विमानाला चंदीगढ विमानतळावर उतरविणे भाग पाडतात.

काहीतरी परिस्थितीमुळे विक्रमला त्या विमानात जाण्याची संधी मिळते. विमानात गेल्यानंतर त्याची भेट हवाई सुंदरी सायराशी (ईशा
देओल) होते.

IFM
सायरा, विक्रमची मदत करते. योजनाबद्ध काम करून विक्रम एक-एक करून सर्व दहशतवादयांना मारून टाकतो आणि सायरा व विक्रम प्रवाशांना वाचविण्यात यशस्वी होतात.

विक्रम लोकांपासून एकटा का राहतो? सायरा कोण? ती विक्रमला मदत का करते? विक्रमच्या मुलीचे काय होते? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी हायजॅक पाहावा लागेल.