प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अथर्व सुदामे अडचणीत
PHOTO-Atharva sudame facebook
आपल्या विनोदी रील ने चाहत्यांची पंसती मिळवणाऱ्या प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अथर्व सुदामे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पुणे महानगर परिवहन मंडळाकडून अथर्व यांना पीएमपीच्या बसमध्ये विना परवानगी चित्रीकरण करण्यासाठी आणि महामंडळाच्या साहित्यांचा वापर केल्याप्रकणी पुणे महानगर मंडळाकडून नोटीस देण्यात आली असून अथर्वला सात दिवसांच्या आत खुलासा देण्याचे सांगितले आहे.
अथर्व ने रील बनवण्यासाठी बसमध्ये चित्रीकरण करताना महामंडळाच्या अधिकृत गणवेश, ई मशीन, बॅच बिल्ला यांचा विना परवानगी घेता वापर केला. या साठी अथर्वने कोणत्याही प्रकाराची लेखी परवानगी घेतलेली नव्हती.तसेच महिला प्रवाशांचे चित्रण अपमानास्पद पद्धतीने केले. या मुळे महिलांच्या सन्मानाला आणि मानसिक सुरक्षितेला बाधा पोहोचली आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या महिलांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्याचा आरोप पीएमपीने केला आहे.
त्याला सात दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आक्षेपार्ह रील तत्काळ सोशल मीडियावरून काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत.
स्वारगेट येथील मुख्य कार्यालयात सात दिवसांत लेखी खुलासा सादर न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रतिबंध: भविष्यात परवानगीशिवाय पीएमपीच्या बसमध्ये किंवा साहित्यासह कोणतेही फोटो, व्हिडिओ प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे.
Edited By - Priya Dixit