शिवसेनेचे ‘मिशन 60’ जाहीर, शिवसेनेची पहिली यादी प्रसिद्ध
आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली असून, आपल्या उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामध्ये 57 अधिकृत आणि 3पुरस्कृत अशा एकूण 60 शिलेदारांना निवडणुकीत उभे केले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सांडभोर यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
संघटनेने जुन्या-जाणत्या अनुभवी कार्यकर्त्यांसह नव्या दमाच्या चेहऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे.
सांडभोर म्हणाले, महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अशी रणनीती आखण्यात आली आहे.
निवडणुकीत शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. ही निवड प्रक्रिया अत्यन्त पारदर्शकपणे पार पडले आहे. या मुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Edited By - Priya Dixit