शुक्रवार, 6 मार्च 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

हिस्स : केवळ बदला

हिस्स केवळ बदला
बॅनर : स्पलिट इमेज पिक्चर्स, वीनस रेकॉर्डस एंड टेप्स
निर्माता : गोविंद मेनन, विक्रम सिं
निर्देशक : जेनिफर लिं
कलाकार : मल्लिका शेरावत, जेफ डॉसिट, इरफान खान, दिव्या दत्ता

मागील दोन वर्षांपासून मल्लिका शेरावतच्या नागिन या चित्रपटाची चर्चा आहे. आता हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. मल्लिकाला या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. तिचा हा चित्रपट हॉलिवुडमध्येही चर्चिला जात आहे.

प्रीडेटर्स, वनीला स्कॉय, हल्क या सारख्या चित्रपटांमध्ये मेकअप करणार्‍या हॉलिवुडचे मेकअपमन व स्पेशल इफेक्टचे तज्ज्ञ असणार्‍या रॉबर्ट कुर्टजमान यांनी नागिन अर्थात मल्लिकाचा मेकअप केला आहे.

त्यांच्या मेकअपची इतकी चर्चा होती की राम गोपाल वर्मांनीही नागिनच्या सेटवर जात शुटिंग पाहिले होते. आता सार्‍यांनाच मल्लिकाच्या या रोल विषयी उत्सुकता आहे.

हिस्स जुनी कथा आहे, परंतु स्पेशल इफेक्टच्या माध्यमातून नवीन रुपात ही कथा मांडण्‍यात आली आहे.

अमेरिकी नागरिक जॉर्ज भारताच्या जंगलातून एक नाग पकडून अमेरिकेला घेऊन जातो. नागची मैत्रिण नागिन अर्थात मल्लिका बदला घेण्‍यासाठी एका सेक्सी महिलेच्या रुपात अमेरिकेत पोहंचते.

नागाला शोधताना ती अनेकांना मारत सुटते. केवळ बदल्याची भावना तिच्या मनात असून, ती आपल्या जिवलग नागाचा शोध घेते अशी या चित्रपटाची कथा आहे.

या चित्रपटाची दिग्दर्शक जेनिफर लिंच असून, चार वेळा ऑस्कर नॉमिनेशन मिळालेल्या व दोनवेळा कॉन फेस्टीव्हल विजेत्या डेव्हिड लिंचची ती मुलगी आहे.

जेनिफरने या चित्रपटात आपला कस पणाला लावला आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.