हॅलो : कॉल सेंटर्समधील जगणं
|
संगीत : साजिद-वाजिद
कलाकार : सोहेल खान, शरमन जोशी, ईशा कोप्पिकर, अमृता अरोरा, गुल पनाग, दिलीप ताहिल, सुरेश मेनन, अरबाज खान, सलमान खान (विशेष भूमिका), कैटरीना कैफ (विशेष भूमिका)
‘दिल ने जिसे अपना कहा’ हा चित्रपट करणा-या अतुल अग्निहोत्री यांनी कॉलसेंटर मध्ये काम करणा-यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारा 'हॅलो' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चेतन भगत यांच्या ‘वन नाइट @ द कॉल सेंटर’ या कादंबरीवर आधारीत आहे.
|
सेल्स टार्गेट पुर्ण करण्याचा दबाव आणि लोकांच्या संतापाला हसत-खेळत संवादातून झेलणे सोपे काम नाही. याचबरोबर दुस-या देशांच्या वेळेनुसार काम करावे लागते. अनेकवेळा पूर्ण राख जागूनही काम करावे लागते.
कॉलसेंटरमधील कामाचा त्यांच्या जीवनावर काय परीणाम होतो याची झलक या चित्रपटातून दाखविण्याचा प्रयत्न अतुल अग्निहोत्री यांनी ‘हॅलो’ या चित्रपटातून केला आहे.
