निर्माता : सुनील मनचंदा, एबी कॉर्प दिग्दर्शक : आर. बाल्की गीत : स्वानंद किरकिरे संगीत : इलाया राजा कलाकार : अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, विद्या बालन, परेश रावल, अरुंधती नाग रेटिंग : 3.5/5
'पा' या चित्रपटाविषयी आतापर्यंत आलेली माहिती वाचता हा रडविणारा चित्रपट असेल. किंवा 'प्रोगेरिया' या रोगाविषयी वृत्तचित्रासारखा चित्रपट असेल. त्यात सहानुभूती असेल आणि सगळा मामला गंभीर असेल. अशा काही कल्पना तयार झाल्या आहेत. पण प्रत्यक्षात या सगळ्या कल्पना बाजूला करणारा हा चित्रपट आहे. 'पा'मधील मुख्य भूमिका असलेल्या ओरोला (अमिताभ बच्चन) या रोगाने नक्कीच ग्रासले आहे. पण ही सगळी कथा अगदी हसत खेळत आणि मुख्य म्हणजे रंजन करत पडद्यावर साकारली आहे.
तेरा वर्षीय ओरो ६५ वर्षाच्या वृद्धासारखा दिसतो आणि राहतोही. लेखक, दिग्दर्शक बाल्कीने या आरोचे वागणे, बोलणे सामान्य
IFM
IFM
मुलासारखेच ठेवले आहे. त्याला कोणतेही वेगळे 'स्टेटस' दिलेले नाही. त्याच्या शाळेतले मित्रही तो काही वेगळा आहे, असे त्याच्याशी वागत नाहीत. त्यामुळे आपणही त्याच्याकडे कोणत्या वेगळ्या नजरेने पहात नाही.
ओरो अतिशय स्मार्ट मुलगा आहे. नेटवर चॅटिंग करतो. गणित चुटकीसरशी सोडवतो. जॅकी चेन त्याला आवडतो नि गेम खेळणे ही त्याची आवड आहे. ही भूमिका अतिशय छान पडद्यावर साकारली गेली आहे.
ओरो आपल्या आई आणि आजीसोबत रहातो. वडिलांविषयी त्याला फारशी माहिती नाही. शाळेच्या एका कार्यक्रमात त्याची भेट अमोल अत्रे (अभिषेक बच्चन) या युवा नेत्याशी होते. दोघेही परस्परांना आवडतात. पण ओरोला नंतर कळते की अमोलच त्याचे 'पा' म्हणजे वडिल आहेत.
लग्नाआधीच त्याची आई (विद्या बालन) अमोलपासून गरोदर राहिली होती. अमोलला मात्र हा गर्भ नको होता. त्यातूनच दोघांत मतभेद होतात. पण आई ओरोला जन्म देतेच. ओरोला ही वस्तुस्थिती कळाल्यानंतर तो आई-वडिलांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतो.
बाल्कीने छोट्या छोट्या प्रसंगातून नर्मविनोदी वातावरणाची निर्मिती केली आहे. काही दृश्ये फारच भावनाशील होण्याची शक्यता असूनही त्याने ती टाळली. त्यामुळे उगाचच रडारड होत नाही. आसू आणि हसू याचा योग्य संगम त्याने घातला आहे.
चित्रपटाचे नाव 'पा' असले तरी ओरो आणि त्याची आई यांच्यातील भावनात्मक नात्याबद्दल चित्रपट जास्त बोलतो. त्याचवेळी ओरोची आणि त्याच्या आजीची चिडवाचिडवीही मस्त जमली आहे. ओरो आणि त्याचा मित्र विष्णू (प्रतीक) यांच्यातील गप्पाही मजा आणतात.
अभिषेक व अमिताभ यांच्यातील काही प्रसंग छान जमले आहेत. या कथेला राजकारणाचा संदर्भ आहे. तिथे मात्र कंटाळा येतो. विद्या आणि अभिषेकची प्रेमकथाही लवकर संपल्यासारखे वाटते.
अभिनयाच्या बाबतीत अमिताभ बच्चन 'बापमाणूस' आहे हे त्यांनी साकारलेल्या मुलाच्या भूमिकेतून जाणवते. ओरोला त्यांनी पडद्यावर जिवंत केले आहे. मेकअपच्या पलीकडे जाऊनही त्यांनी ओरोच्या व्यक्तिमत्वातून अभिनय बाहेर काढला आहे. देहबोली, डोळ्यांची हालचाल यातून त्यांचा जबरदस्त अभिनय दिसून येतो.
IFM
IFM
अभिषेक बच्चन युवा नेता आणि एक 'पा' म्हणूनही छान वाटतो. ही भूमिका त्याचा आत्मविश्वास वाढविणारी ठरावी. विद्या बालनही छान वाटते. विशेषतः ड्रेसची निवड योग्य केल्याने ती आई म्हणून शोभून दिसते. ओरोची आजी बनलेल्या अरूंधती नागही मस्त.
अमिताभचा मेकअप करणार्या क्रिस्टिन टिन्सले आणि डोमिनी टिल यांची कामगिरी अर्थातच छान आहे. इलाया राजाचे संगीत चित्रपटाच्या मूडला साजेसे आहे. पी. सी. श्रीराम यांची फोटोग्राफी उल्लेखनीय.