1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. चित्रपट समीक्षा

''विक्ट्री'' : मूड- ऑफ

विक्ट्री  मूड ऑफ
IFM
निर्माता - मनमोहन शेट्टी, अजीतपाल मंगत
दिग्दर्शक - अजीतपाल मंगत
संगीत - अन्नू मलिक
कलाकार - हरमन बावेजा, अमृता राव, अनुपम खेर, गुलशन ग्रोवर, दलीप ताहिल


भारतात क्रिकेट सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. या खेळावर आधारीत अनेक चित्रपट होऊन गेले.'लगान'याचा धागाच क्रिकेट होता.त्यामुळे हा विषय निर्मात्यांना आकर्षित करत आहे. दिग्दर्शक अजीतपाल मंगत यांनी हरमन बावेजा यांना घेऊन 'विक्ट्री' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गल्लीबोळापासून मैदानांमध्ये क्रिकेटचा फ्लेवर असतो. भारताकडून खेळावे, असे प्रत्येकाला वाटत असते, हाच धागा पकडून चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

राम नावाच्या एका वडिलांची 'विक्ट्री' ही कथा आहे.आपला मुलगा विजय शेखावतने भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व करावे, अशी त्यांची इच्छा असते.विजय आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करतो, अशी या चित्रपटाची थीम आहे. चित्रटामध्ये जगभरातील आंतराष्ट्रीय खेळाडू दाखविण्यात आले आहेत.


IFM
क्रिकेटमध्ये सलग सामने जिंकत आल्यानंतर एखादी हार सगळ्या उत्साहावर पाणी फेरते. 'विक्ट्री' च्या बाबतीच असेच म्हणावे लागेल. बॉलीवूडमध्ये चांगल्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होत असताना असा चित्रपट प्रेक्षकांबरोबरच बॉलीवूडचाही मुड-ऑफ करतो. क्रिकेट आणि इतर खेळाडूंच्या जीवनावर आधारीत 'इकबाल', 'चक दे इंडीया' सारखाच हा चित्रपट आहे. विजय (हरमन बावेजा) हा भारतीय फलंदाज 12 चेंडूत 50 धावा करतो आणि भारताचा विजय होतो, एवढाच काय तो चित्रपटाचा धागा. पण, नवज्योत सिंह सिद्धूच्या कॉमेट्रीची नक्कल आणि ब्रेट ली सारख्या खेळाडूंची झलक दाखवून चित्रपटात मसाला घालण्याचा फसलेला प्रयत्न करण्यात आला आहे.

'विक्‍ट्री' बघायला जाताना क्रिकेटबाबत चांगले काही बघण्यास जातो आहोत असा गैरसमज करून घेऊ नकात. काही आक्रमक भाषणे सहन करण्यासाठी आणि काहीतरी फिल्मी बघायचे असेल तर नक्कीच हा चित्रपट पाहण्यासारखा आहे. हरमन आणि अमृताचा अभिनय ठीक आहे. आपल्या वडिलांना शतक अर्पण करण्या-या सचिन तेंडुलकरसारखेच हरमन बावेजा आपल्या स्वर्गीय वडिलांना स्मरून हवेत बॅट उंचावताना दाखविण्यात आले आहे. 'लव्हस्टोरी 2050' हा चित्रपट आपटल्याने त्याच्यासाठी हा चित्रपट 'करो या मरो' असाच होता यासाठी त्याने माजी कसोटी खेळाडू प्रवीण आमरे यांच्याकडून टिप्स घेतल्या होत्या. तरीदेखील त्याने विशेष असे काहीच करून दाखविलेले नाही.

दिग्दर्शक अजीतपाल मंगत लहानपणापासूनच क्रिकेटवेडे आहेत. क्रिकेट हा खेळ भारतात सर्वांत लोकप्रिय आहे त्यामुळे त्यांनी याच धर्तीवर चित्रपट करण्याचा निर्णय घेतला होता मात्र, आपल्या मनातील संकल्पना पडद्यावर उतरविण्यात त्यांना अपयश आले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा