मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. फ्लॅशबॅक-26/11
Written By वेबदुनिया|

मुंबई हल्ला : तुम्हाला काय वाटते?

ND
ND
२६ नोव्हेंबर २००८. मुंबईच काय देशवासियांसाठीही कधीही न विसरली जाणारी तारीख. कधीही न थांबणार्‍या मुंबई नगरीला याच दिवशी पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी ताब्यात घेतले. तब्बल तीन दिवस त्यांनी मुंबईला वेठीस धरले. त्यांनी घडविलेल्या नृशंस हिंसाचारात अनेक निरपराधांना जीव गमवावे लागले. ताज, ट्रायडंट, लिओपोल्ड हॉटेल, नरिमन हाऊस आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि समोरचा रस्ता रक्तलांच्छित झाला. भारतभूच्या जॉंबाज जवानांनी या अतिरेक्यांचा यशस्वी मुकाबला करत या मुंबईला त्यांच्या तावडीतून मुक्त केले. पण या संघर्षात अनेक जवानांनाही प्राण गमवावे लागले.

काळ हाच कुठल्याही गोष्टीवर उपाय असतो. आता या हल्ल्याला एक वर्ष झाले आहे. जखमा भरल्या असल्या तरी त्याचे व्रण मात्र कायम आहेत. या हल्ल्यात शहिद झालेल्यांविषयीच्या आपल्या भावनाही कायम आहेत. त्याचवेळी देशाच्या अस्मितेवर झालेल्या या भ्याड हल्ल्याविषयीचा संतापही आहे. देशाविषयी, या हल्ल्याविषयी आणि त्यात मृत आणि शहिद झालेल्यांविषयी तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या भावना इथे मोकळ्या करा. व्यक्त व्हा.