मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. फ्लॅशबॅक-26/11
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , गुरूवार, 26 नोव्हेंबर 2009 (18:49 IST)

सात वर्षाच्या मुलाची पुणे-मुंबई स्केटिंग

मुंबईवर गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत आणि हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ओंकार ढोरे नावाचा सात वर्षाचा मुलगा पुण्याहून येते स्केटिंग करत आला.

ओंकार काल सकाळी पुण्याहून मुंबईला यायला निघाला. आज दुपारी तो मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचला. त्याच्यासोबत डॉक्टरांची दोन पथकेही होती. या प्रवासाची तो गेल्या दोन महिन्यांपासून तयारी करत होतो. सीएसटीसह दहशतवाद्यांची लक्ष्य ठरलेल्या कामा हॉस्पिटल, ताज, ट्रायडं हॉटेल आणि नरिमन हाऊस येथेही तो जाणार आहे.