मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. परदेशातील संधी
Written By वेबदुनिया|

ऑस्ट्रेलियात शिका कौन्सिलिंग

WDWD
गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियात शिक्षण घेण्याचा नागरिकांचा कल वाढला आहे. मेडिकल, मॅनेजमेंट, इंजीनियरिंगनंतर फॅशन डिझायनिंग, लाइफ स्टाइल, कौन्सिलिंग अशा अनेक विषयांमध्ये प्रवेश घेऊन त्यात करीयर करता येऊ शकते.

ऑस्ट्रेलिया इंस्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल काऊंसेलर या संस्थेत 'व्यावसायिक कौन्सिलिंग' या विषयाचे डिप्लोमा व पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्याक्रमांतर्गत पूर्ण वेळ, अर्ध वेळ व दूर शिक्षण पध्दतीने पदवी व डिप्लोमा करण्याची सोय उपलब्ध आहे.

कौन्सिलिंगची पदवी प्राप्‍त केल्यानंतर कुठल्याही कौन्सिलिंग इंस्टिट्यूटमध्ये नोकरी करून किंवा स्वत: 'कौन्सिलर' होऊन स्वतंत्र करीयर सुरू करता येऊ शकते.

अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधावा-
15, फोर्टिट्यूड व्हॅली, क्यूएलडी, ऑस्ट्रेलिया.