suvichar

फ्रेंडशीपही जिंदगी है यार....

Updated: गुरूवार, 1 ऑगस्ट 2019 (11:21 IST)
मैत्री हे नाते रक्ताचे नसले तरीही त्या नात्याला श्वासाइतके महत्त्व आहे. कारण या नात्यामध्ये असणारा आपलेपणा, विश्वास, आत्मविश्वास आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संकटसमयी धावून येण्याची जिद्द हेच होय. या शुध्द भावनांच्या आधारावर असणारी मैत्री ही कोणाबरोबर असावी याचा काही नियम नाही. मैत्री ही लहानांची मोठ्याशी, मुलाची मुलीशी तर संकट समयी धावून येणा-या प्रत्येक व्यक्तीशी आपली मैत्री असते. या मैत्रीला कोणत्याही भेदभावाचा डाग नाही. त्यामुळेच या नात्याचे महत्त्व रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठे आहे.

आपली जीवनाची पावलं पडू लागली की आपण मैत्री या बंधनात अडकतो. जीवनाच्या प्रत्येक टप्यावर आपल्या मैत्रीचा बगिचा वेगळ्याच दुनियादारीने फुलत असतो. त्यामध्ये शाळेतील मैत्री, कॉलेज जीवनातील मैत्री अन् संकट समयी धावून येणारी मैत्री याचा समावेश आहे. शाळेतील मैत्री खेळण्या-बागडण्याचा आनंद देते तर कॉलेजच्या मैत्रीची जिंदगी काही औरच असते. तिची मला खूप काळजी वाटतेय, तू पोहचलास का घरी?, तू जेवलीस का?, ती आज कॉलेजला आलीच नाही, तू आजारी आहेस का?, काही मदत लागली तर फोन कर, अरे.. यार मैत्रीसाठी काय पण... अशा एक ना अनेक वाक्यांनी कॉलेज जीवनातील मैत्रीचे स्वरूप अगदीच जिवलग झाल्याचे आपणास दिसून येते. कॉलेज कट्ट्यावरील मित्र-मैत्रिंणीची चाललेली एकमेकांबाबतची विचारपूस, मैत्रीच्या भावनांना आपलेपणाचा सुगंध कधी दरवळून टाकते हे आपल्यालाही कळत नाही. तर जिवापाड प्रेम करणा-या मित्रांच्या मनातील हितगुज जाणून घेत असतानाही जीवनातील सुख, दु:खांचा सारीपाट आपल्याला नेहमीच ठेंगणा वाटत असतो. पण या मैत्रीची ताकद म्हणावी तरी किती? जिवलग मित्रासाठी मित्राने आपले प्राण पणाला लावल्याची उदाहरणे आपल्याला कमी का माहीत आहेत. मैत्री ही नेमकी हात आणि डोळ्यांसारखी आहे. जर हाताला लागले तर डोळ्यांत पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसण्यासाठी हातच पुढे येतात. तसे मित्राच्या कोणत्याही दु:खात मदतीसाठी मैत्रीचेच हात पुढे येतात. या सर्वांमध्ये मित्र किंवा मैत्रिणीविषयी असणारी निढळ, स्वच्छ, निःस्वार्थी भावना आपल्या हृदयामध्ये आपसूकच गोडवा निर्माण करून जाते. मैत्रीतील ते रुसणं, हसणं आणि उगाचंच कशावरून तरी भांडणं हे या मैत्रीमध्ये अधिकच रंग निर्माण करून जातं. पुन्हा त्या मित्राच्या अथवा मैत्रिणीच्या आठवणीमध्ये स्वप्नांची दुनिया रंगविताना आपणच आपल्या मनाला दोष दिल्याशिवाय राहात नाही. त्याचे कारण म्हणजे स्वतःपेक्षा आपलीच जास्त काळजी घेणा-या मित्राचं मन आपण दुखावलेलं असतं. आयुष्यामध्ये कोणतीही संकटं ठेचकाळली तरी आपण ती मैत्रीच्या आधाराने सर करून त्या संकटावर मात करीत असतो. यामागे मैत्रीतून मिळालेला आधार आणि तितक्याच उन्मेषाचा असलेला विश्वास हा महत्त्वाचा ठरतो. तिचा चुकलेला मार्ग तो सावरतो तर त्याच्या चुकांवरती चार शब्द सुनावण्यासाठी तीही मागेपुढे पाहात नाही.

मैत्रीत असतो ना एवढा हक्क त्याला आणि तिला. अशीच असते ही मैत्री, जी जीवनाच्या प्रत्येक उंबरठ्यावर प्रत्येक क्षणाला एकमेकांच्या मदतीला धावते. तर सुखाचे क्षण व्दिगुणित करून दु:खाच्या समयाला विश्वासाचा आधार देते. अशाच या मैत्रीचा गौरव करणा-या फ्रेंडशीप डे साठी सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा...यारा...यारा...फ्रेंडशीपचा खेळ सारा....
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

तुमच्या चॉपिंग बोर्डला वास येऊ लागला, तर काही मिनिटांतच तो स्वच्छ करा

अजिबात मऊ पडणार नाही! १-२ महिने टिकणारी गव्हाच्या पिठाची खमंग चकली

Ganesh Chaturthi Wishes 2026 in Marathi गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Hartalika Tritiya 2026 Wishes in Marathi हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठीत

World First Aid Day 2026 : जागतिक प्रथमोपचार दिवस

पुढील लेख
Show comments