बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मार्च 2019 (11:52 IST)

आयुष्य म्हणजे काय आहे

एक धुंद संध्याकाळ, 4 मैत्रीणी 
4 कप चहा, 1 टेबल ... 
 
आयुष्य म्हणजे काय..
1 इनोव्हा कार, 7 मैत्रिणी , आणि एक मोकळा पहाडी रस्ता .... 
 
आयुष्य म्हणजे काय..
1 मैत्रिणीचे घर, हलकासा पाऊस, आणि खूप खूप गप्पा ... 
 
आयुष्य म्हणजे काय...
शाळेच्या मैत्रिणीसह, बुडवलेला तास, 1 कचोरी, 2 सामोसे,  आणि बिलावरून झालेला वाद ...  
 
आयुष्य म्हणजे काय...
फोन उचलताच पडणारी मैत्रिणीची  गोड शिवी, आणि सॉरी म्हटल्यावर अजून एक शिवी ...
 
आयुष्य म्हणजे काय ...
काही वर्षानंतर, अचानक जुन्या मैत्रीणीचा एक मेसेज, अंधुक झालेल्‍या काही ओल्या आठवणी आणि डोळ्यातले पाणी ... 
 
आपण खूप मैत्रीणी  जमवतो.. 
काही खूप जवळचय मैत्रीणी बनतात ... 
काही खास मैत्रीणी  होतात .. 
काहींच्या आपण प्रेमात पडतो. 
काही परदेशात जातात
काही शहर बदलतात .. 
काही आपल्याला सोडून जातात .. 
आपण काहींना सोडतो  
काही संपर्कात राहतात  
काहींचा संपर्क तुटतो  
काही संपर्क करत नाहीत  
त्यांच्या अहंकारामुळे .. 
कधी आपण संपर्क करत नाही .. 
आपल्या अहंकारामुळे  ..  
ते कुठेही असोत.. 
कसेही असोत.. 
आपल्याला त्यांची आठवण असतेच ..  
आपलं प्रेमही असत  
आपल्याला त्यांची उणीव भासते  
आपल्याला त्यांची काळजीही असते ..
 
कारण आपल्या आयुष्यात त्यांचे एक स्थान असतंच...
 
तुम्ही किती वेळा भेटता,  बोलता, किंवा किती जवळचे आहात ते महत्वाचे नाही .. 
जुन्या मैत्रीणींना कळुदे की तुम्ही त्यांना विसरला नाहीत .. 
आणि नवीन मैत्रिणींना  सांगा की तुम्ही त्यांना विसरणार नाही ...