सोमवार, 29 डिसेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. फ्रेंडशिप डे
Written By

Friendship Day : जुनं सारं जपताना नव्याशी जमवून घेतलं

Friendship Day In Marathi
अनेक घटनांचा पट
जेव्हा डोळ्यासमोर उलगडतो 
माझ्या  मैत्रिणींचा मला 
खूप अभिमान वाटतो 
 
डबल इंजिन हवं म्हणून 
कुणी नोकऱ्या केल्या 
मुळीच गरज नाही म्हटल्यावर 
घर-गृहस्थीत रमल्या
 
खूप खूप शिकून कुणी  
बाहेर कर्तृत्व गाजवलं 
पण त्याचवेळी घराचं 
घरपण मात्र टिकवलं 
 
थोरांना सांभाळून घेताना 
पोरांना उत्तम घडवलं 
त्यांना परदेशी पाठवताना 
डोळ्यातलं पाणी लपवलं 
 
पतीला साथ देताना कुणी 
दूरदेशी रमल्या 
इथल्या रेशीमगाठी मात्र 
हृदयाशी घट्ट जपल्या 
 
पूजा-अर्चा तशाच पार्ट्या 
प्रत्येक आव्हान पेललं 
आल्या - गेल्याचं स्वागत अगदी 
हसत मुखानं केलं 
 
जुनं सारं जपताना 
नव्याशी जमवून घेतलं 
ईमेल, व्हॉट्सअप,स्काईपला 
अगदी आपलंसं केलं 
 
प्रत्येकीचा प्रसन्न चेहरा नि जवळ समाधानाची शिदोरी आहे माझ्या अशा मैत्रिणींचा मला खरंच अभिमान आहे.