मंगळवार, 6 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. मैत्री दिन
Written By वेबदुनिया|

अखंड मैत्री जीवनाचा आधार

अखंड मैत्री
मित्र-मैत्रिणींचे ग्रुप आपण कॉलेजात पाहतो. कॉलेज कट्ट्यावर तासनतास चालणार्‍या त्यांच्यातल्या गप्पा आपण पाहतो. त्यांची ती एकमेंकाशी चालणारी मस्करी, त्याचे ते मोठमोठ्याने खिदळणे पाहून त्यांचा इतरांना हेवा वाटावा अशी त्यांच्यात मैत्री असते. मात्र, शिक्षण पूर्ण झाल्यावर ती कॉलेज कट्टयावरच विरणारी असते. काळाच्या प्रवाहात आपण जस जसे पुढे जातो तस तसे नवीन मित्र भेटतात. त्यांच्यात आपल्या आधीच्या मित्रांचा विसर पडतो.

बालमित्र असणारी आज तर कोणी भेटतच नाही. आयुष्याच्या खाचखडग्यांच्या वाटेवर सुख-दु:ख वाटून घेणारा मित्राची पावला पावलावर उणीव तयार व्यक्‍तीला भासत असतेच. त्यामुळे आपले बालपण, तारूण्य माहित असणारा मित्र हा आपल्याला आयुष्यात मार्गदर्शकच ठरतो, तो जीवनाच्या आधार असतो.