1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. G20 शिखर परिषद
Written By
Last Updated : शनिवार, 9 सप्टेंबर 2023 (10:46 IST)

LIVEनवी दिल्लीत आजपासून G-20 परिषद, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह 20 देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित

g20
राष्ट्रपती मुर्मूंनी जी-20 साठी आलेल्या पाहुण्याचं केलं स्वागत
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-20 परिषदेसाठी आलेले देशांचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी यांचे स्वागत केलंय. भारतानं 'वसुधैव कुटुंबकम् : एक सृष्टी, एक कुटुंब, एक भविष्य' हे ध्येय ठेवलंय आणि त्यादृष्टीने यश मिळेल, अशी आशाही राष्ट्रपती मुर्मूंनी व्यक्त केलीय.
 
G20 परिषद भारत आणि मोदी सरकारसाठी किती महत्त्वाची?
भारताला मिळणारा मान चीनला पटत नसणार - उदय भास्कर
आंतरराष्ट्रीय विषयांवरील अभ्यासक उदय भास्कर यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं की, "जर चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग हे जी-20 साठी उपस्थित राहू शकत नसतील, जरी त्यांचे देशाअंतर्गत कारणं असतील, तरीही असं असू शकतं की, भारताला जी-20 मुळे मिळणारा विशेष मान चीनला पटत नसेल."
 
आज दिवसभरात असा असेल कार्यक्रम :
सकाळी 9.20 ते 10.20 वा. - भारत मंडपमध्ये पाहुण्यांचं आगमन होईल
सकाळी 10.30 ते दु. 1.30 वा. - सत्र पहिलं - 'वन अर्थ'
दुपारी 1.30 ते 3 वा. - बैठकांचं सत्र
दुपारी 3 ते संध्या. 4.45 - सत्र दुसरं - 'वन फॅमिली'
संध्या. 4.45 ते 5.30 वा. - बैठकांचं सत्र
संध्या. 7 ते रात्री 9.15 वा. - राष्ट्रपतींतर्फे स्नेहभोजन
 
आजपासून जी-20 परिषदेला सुरुवात
भारतात 18 वी जी-20 परिषद आजपासून सुरू होते आहे. राजधानी दिल्लीत या परिषदेसाठी जोरदार तयारी करण्यात आलीय.
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक, जर्मन चॅन्सलर ओलाफ शोल्झ यांच्यासह अनेक जागतिक नेते या परिषदेसाठी दिल्लीत दाखल झालेत.
 
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग परिषदेला अनुपस्थित राहाणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 
भारताच्या अध्यक्षतेखाली जी-20 परिषद पहिल्यांदाच होतेय.
 
या परिषदेसाठी दिल्लीच्या प्रगती मैदानावर एक नवीन कॉन्फरन्स कॉप्लेक्स उभं करण्यात आलं आहे. त्याला भारत मंडपम असं नाव दिलेलं आहे.