शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Modified: गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (16:25 IST)

Ganesh Chaturthi 2022 घरी गणेश चतुर्थीसाठी कशी मूर्ती आणावी ?

ganesha puja sahitya
31 ऑगस्ट 2022 पासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्ती खरेदी करताना काय लक्षात ठेवावे ते जाणून घ्या
 
1. गणेशाची मुद्रा
गणपतीची विराजित अर्थात बसलेली मूर्ती सर्वोत्तम मानली जाते. अशा प्रकारच्या मूर्तीमुळे कुटुंबात शांती राहते.
 
2. इको फ्रेंडली गणेश
गणेशाची मूर्ती घरी आणावी किंवा स्वतः मातीपासून बनवावी. प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा इतर रसायनांचा वापर करून बनवलेल्या मूर्तींची पूजा करू नये
 
3 गणेशाच्या सोंडेची दिशा
गणपतीची मूर्ती डावीकडे सोंड वळलेली असावी, कारण ती यश आणि समृद्धीची दिशा मानली जाते. 
 
4 मोदक आणि उंदीर
घरासाठी गणपतीची मूर्ती खरेदी करताना मोदक आणि उंदीर मूर्तीचा भाग असल्याची खात्री करा.
 
5 पांढर्‍या रंगाच्या गणेशमूर्ती
पांढऱ्या किंवा शेंदुरी रंगाच्या बाप्पाची मूर्ती घरी विराजित करणे शुभ मानले जाते.
 
6 गणेशाची पाठ
मूर्तीची प्रतिष्ठापना करताना नेहमी लक्षात ठेवा की गणेशाची पाठ घराच्या बाहेरील बाजूस असावी.
 
7 या दिशेला गणेशमूर्तीची स्थापना करा
श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना पश्चिम, उत्तर आणि उत्तर-पूर्व दिशेला करणे चांगले मानले जाते.
 
8 अशा ठिकाणी गणेशमूर्ती ठेवू नका
बेडरूममध्ये, गॅरेजमध्ये किंवा लॉन्ड्री एरियामध्ये, बाथरूमजवळ  किंवा पायऱ्यांखाली गणेशमूर्ती ठेवू नये.
 
9. लाल कापड
गणपतीची मूर्ती थेट जमिनीवर ठेवू नये. देवाची मूर्ती पाट किंवा चौरंगावर लाल कापड पसरवून विराजित करावी.