शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Updated : सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (16:57 IST)

Ganesh Chaturthi 2022 Date गणेश चतुर्थी केव्हा आहे, शुभ मुहूर्त जाणून घ्या

ganesh chaturthi 2022 date muhurat
Ganesh Chaturthi 2022 Date गणेश चतुर्थीचा पवित्र सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा दिवस 10 दिवसांच्या गणेशोत्सवाची सुरुवात देखील करतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक घरोघरी गणपतीची स्थापना करतात. अनंत चतुर्दशीला गणपतीला निरोप देऊन मूर्तीचे विसर्जन केले जाते.
 
या वर्षी बुधवार 31 ऑगस्टला, भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी आहे. बुधवारी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2022) आल्याने या व्रताचे महत्त्व अनेक पटींनी वाढत आहे कारण गणपती बाप्पा स्वतः बुधवारचा देव आहे. भक्तांकडे परंपरेनुसार घरात दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवस गणपती घरात विराजित केले जातात.  धार्मिक मान्यतेनुसार श्रीगणेशाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवन आनंदमय बनते. जाणून घेऊया गणेश चतुर्थी तिथी, पूजा पद्धत, शुभ मुहूर्त, पदार्थांची यादी आणि मंत्र...
 
Ganesh Chaturthi 2022 Date - 31 ऑगस्ट 2022
चतुर्थी तिथी आरंभ - 30 ऑगस्ट 2022 दुपारी 03:33 वाजता
चतुर्थी तिथी संपेल - 31 ऑगस्ट 2022 दुपारी 03:22 वाजता
 
गणेश चतुर्थी पूजा विधी
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
स्नान केल्यानंतर घरातील मंदिरात दिवा लावावा.
या दिवशी गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली जाते.
गणपतीला गंगाजलाने अभिषेक करावा.
गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.
शक्य असल्यास या दिवशीही व्रत ठेवावे.
गणपतीला फुले अर्पण करावीत.
तसेच गणेशाला दुर्वा अर्पण कराव्या.
श्रीगणेशाला सिंदूर लावावं.
श्रीगणेशाचे ध्यान करावे.
तसेच गणेशजींना नैवेद्य दाखवावा. तुम्ही गणपतीला मोदक किंवा लाडूही अर्पण करू शकता.
श्रीगणेशाची आरती करावी.
पूजा करताना ऊं गं गणपतये नम: मंत्र जप करावा.