बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified: गुरूवार, 21 एप्रिल 2022 (15:53 IST)

आरती काळभैरवाची Kaal Bhairav Aarti

आरती ओवाळू भावे, काळभैरवाला ।।
दीनदयाळा  भक्तवत्सला, प्रसन्न हो मजला ।।
देवा,  प्रसन्न हो मजला ।।धृ।।
धन्य तुझा अवतार जगीं या, रौद्ररूपधारी ।
उग्र भयंकर भव्य मूर्ती परि, भक्तासी तारी ।
काशीक्षेत्री नास तुझा तूं, तिथला अधिकारी ।
तुझिया नामस्मरणे पळती, पिशाच्चादि भारी ।।
पळती, पिशाच्चादि भारी ।।आरती...।।1।।
उपासकां वरदायक होसी, ऐसी तव किर्ती ।
क्षुद्र जीवा मी अपराध्यांना, माझ्या नच गणती ।
क्षमा करावी कृपा असावी, सदैव मजवरती ।
मिलिंदमाधव म्हणे देवा, घडो तुझी भक्ती ।।
देवा, घडो तुझी भक्ती ।।आरती...।।2।।