अभिनेते परेश रावल यांचा उमेदवारी अर्ज दाखल
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघातून अखेर भाजपकडून उमेदवारी दाखल केली. परेश रावल यांना उमेदवारी देण्यावरुन भाजपमध्ये बराच खलही झाला. याआधी या भागातून अडवाणींचे खंदे समर्थक समजले जाणारे हरीन पाठक निवडणूक लढवत होते. मात्र, ऐनवेळेस पाठकांचा पत्ता कट करत परेश रावल यांना उमेदवारी देण्यात आली.
दरम्यान, लोकांनी निवडून दिल्यास अहमदाबाद शहराच्या समस्यांना प्राधान्यक्रम देऊ, असं यावेळी परेश रावल म्हणालेत.

