अमरावतीत 46 हजार मतदारांची नावे गायब!
ऐन मतदानाच्या दिवशीत अमरातवीत मोठा गोंधळ उडाला आहे. तब्बल 46 हजार मतदारांची नावं यादीत नसल्याचा दावा आमदार अभिजीत अडसूळ यांनी केला आहे.
मतदार यादीत नाव नसल्यामुळे संतप्त मतदारांनी तहसील कार्यालयात गोंधळ घातला. मतदान कार्ड असूनही या मतदारांचे मतदान यादीत नाव नाही. यामुळे संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयात एकच गोंधळ घातला. या गोंधळानंतर आमदार अभिजीत अडसूळ आणि प्रवीण पोटे यांनी तहसीलदार कार्यालयात हजेरी लावली. आमदारांच्या दाव्याप्रमाणे जवळपास 46 हजार मतदारांची नाव कार्ड असूनही यादीत नाहीत. त्यामुळे संतप्त मतदारांनी सरकारी अधिकार्यांना जाब विचारायला सुरूवात केली.
दरम्यान, यादीत नाव नसलेल्या मतदारांना मतदान करू द्या, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असा इशारा शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे.
दरम्यान, यादीत नाव नसलेल्या मतदारांना मतदान करू द्या, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असा इशारा शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे.

