मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 23 मे 2014 (11:37 IST)

अशोक चव्हाणांची आज पेडन्यूजप्रकरणी सुनावणी

नांदेड येथील कॉंग्रेसचे नवनिर्वाचित खासदार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द केला. मात्र, त्यांच्या या राजीनाम्याचा फायदा त्यांना पेडन्यूज प्रकरणी आज (शुक्रवार) सुनावणी होणार आहे.

अशोक चव्हाण हे निवडणूक आयोगासमोर होणार्‍या सुनावणीला हजर होणार असल्याचे समजते. या प्रकरणात आयोगाने चव्हाणांना दोषी ठरवल्यास त्यांना खासदारकही गमवावी लागू शकते.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी 2009 च्या विधानसभेत भोकर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी राज्यातल्या विविध वर्तमानपत्रांत 'अशोकपर्व' शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवर आक्षेप घेऊन त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या डॉ.माधवराव किन्हाळकर यांनी पेडन्यूजचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.