1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. ओडिशात माओवाद्यांचा मतदानाला विरोध

ओडिशात माओवाद्यांचा मतदानाला विरोध

येत्या 10 एप्रिलला होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर नागरिकांनी बंदी घालावी, असा संदेश माओवादी कम्युनिस्ट पक्षाकडून देण्यात  आला आहे. ओडिशात दहा एप्रिलला मतदान होत असून, त्यापूर्वीच माओवाद्यांकडून नागरिकांना ऑडिओ टेपच्या माध्यमातून संदेश देण्यात आला आहे.  कोरापूट, रायगाडा, कलहंडी आणि कंधमाल या चार जिल्ह्यातील नागरिकांनी मतदान न करण्‍याचा इशारा देण्यात आला आहे.

ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दल (बीजेडी), भाजप आणि काँग्रेसला मतदान न करण्याचे आवाहन केले आहे. ओडिशा सरकारकडून गरिब व आदिवासींवर  अन्याय होत असल्याचा आणि शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप, माओवाद्यांनी केला आहे.