1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 12 एप्रिल 2014 (10:18 IST)

काँग्रेसला वाजपेयींचा आधार

atal bihari
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आपली सगळी अस्त्र निष्प्रभ ठरत असल्याने, काँग्रेसने आता मोदींविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी थेट माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आधार घेतला आहे.

त्यांनी आपल्या वेबसाइटवर वाजपेयींचा फोटो लावला आणि त्यावर ‘मोदी ने राजधर्म का पालन नहीं किया’,हे वाक्य अगदी ठळकपणे नमूद केले आहे. हे वाजपेयींचेच मत असल्याचे भासवून मोदींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडले आहेत. नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर तुफानी हल्ला चढवला आहे.