भाजप मुंडेंच्या पराभवाची वाट पाहतोय-शरद पवार
भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पराभवाची वाट त्यांच्यात पक्षातील हितचिंतक नेते पाहात असल्याचा असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारासाठी आष्टीमध्ये आयोजित सभेत बोलत होते.
मागील काही वर्षात गोपीनाथ मुंडेंनी सार्वजनिक आयुष्य़ात काय काम केल याचा विचार करावा. त्यांनी जिल्ह्यासाठी काहीही केले नसल्याने, भाजपचे काही हितचिंतक आणि मी गोपीनाथ मुंडेंच्या पराभवाची वाट पाहतोय, असे पवार म्हणाले.
पण पवारांच्या या गौप्यस्फोटानंतर एक प्रश्न उपस्थित झाला आहे. तो म्हणजे भाजपमध्ये असा कुठला नेता आहे जो गोपीनाथ मुंडेंच्या पराभवाची वाट पाहत आहे.
पण पवारांच्या या गौप्यस्फोटानंतर एक प्रश्न उपस्थित झाला आहे. तो म्हणजे भाजपमध्ये असा कुठला नेता आहे जो गोपीनाथ मुंडेंच्या पराभवाची वाट पाहत आहे.

