वाराणसीत जदयूचा केजरीवालांना पाठिंबा
वाराणसीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना जोरदार आव्हान देण्यासाठी जनता दल (संयुक्त) पक्षाने आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले.
जदयूचे अध्यक्ष शरद यादव केजरीवाल यांच्या समर्थनार्थ वाराणसीमध्ये निवडणूक प्रचारही करणार असल्याचे जदयू नेते के.सी. त्यागी यांनी सांगितले. वाराणसीमधून मोदींविरोधात अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच काँग्रेसचे अजय राय निवडणूक लढवत आहेत.
जदयू या आधी एनडीएतील भाजपा मित्रपक्ष होता. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारप्रमुखपदी निवड झाल्याने नाराज झालेल्या संयुक्त जनता दलाने (जेडीयू) अखेर भाजपशी कडीमोड घेतला आहे.

