1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. वाराणसीतून लढणे हा सन्मान : मोदी

वाराणसीतून लढणे हा सन्मान : मोदी

Election 2014 Marathi News
‘वाराणसीसारख्या पवित्र शहरातून निवडणूक लढण्याची संधी मिळणे हा सन्मान आहे,’अशी भावना व्यक्त करतानाच,‘गंगा माता आणि काशी विश्वनाथच्या आशीर्वादाने आम्ही ‘272प्लस’चे मिशन नक्कीच पूर्ण करू,’असा विश्वास एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवला आहे. मोदी यांना वाराणसीतून निवडणुकीच्या रणांगणात उतरविण्याच्या निर्णयावर शनिवारी रात्री पक्षाने शिक्कामोर्तब केले. या निर्णयानंतर मोदी यांनी तत्काळ ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. वाराणसीतून निवडणूक लढण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले.‘मी सर्वाचा आभारी आहे. गंगा माता आणि काशी विश्वनाथने घेऊन आता आपण कामाला लागू आणि भारताला मजबूत व शक्तिशाली बनविण्यासाठी प्रयत्न करू,’असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.