मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 28 मे 2014 (13:41 IST)

शिवसेनेची नाराजी दूर; अनंत गितेंनी स्वीकारला पदभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कमी महत्त्वाचे मंत्रीपद मिळाल्याने शिवसेनेचे नाराज मंत्री अनंत गिते यांनी अखेर आज(बुधवारी) आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. अनंत गिते यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची याबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर गितेंनी मंत्रीपद स्विकारले. विशेष म्हणजे शिवसेनेने आणखी एक मंत्रीपदाची मागणी केल्याचे समजते. 

मोदींच्या मंत्रिमंडळाचा येत्या महिन्याभरात विस्तार होणार आहे. त्यावेळी शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना ही लोकाभीमूख संघटना असून आम्हाला लोकांची जास्तीत जास्त कामे करायची असल्याचे गितेंनी सांगितले.