1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. सात राज्यांत 64 जागांसाठी मतदान सुरु

सात राज्यांत 64 जागांसाठी मतदान सुरु

16 लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यात आज (बुधवार) सात राज्यांत 64 जागांसाठी मतदान होत आहे. या टप्प्यात अनेक दिग्गज नेते रिंगणात आहेत. लोकसभेशिवाय सीमांध्र विधानसभेसाठीही मतदान होत आहे. 

उत्तराखंडमधील पाच, हिमाचल प्रदेशातील चार जागांसाठी मतदान होईल. यानंतर 12 मे रोजी अंतिम टप्प्यात 41 जागांसाठी मतदान होणार आहे.  उत्तरप्रदेशात कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, भाजपच्या स्मृती इराणी, आपचे कुमार विश्वास, वरुण गांधी, बेनीप्रसाद शर्मा, मौहंमद कैफ या दिग्गजांचे भाग्य मतदान यंत्रांत बंद होणार आहे.

बिहारमध्ये रामविलास पासवास, राबडीदेवी, राजीव प्रताप रुढी आणि हिमाचलमध्ये प्रतिमा सिंह, अनुराग ठाकूर आदी दिग्गज नशीब आजमावत आहेत.

दरम्यान, आंध्र प्रदेशाचे तेलंगाणा आरि सीमांध्र अशा दोन राज्यांत विभाजन झाले आहे. सीमांध्रमध्ये 175  विधानसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. 30 एप्रिल रोजी तेलंगणा मतदान झाले होते.